सुप्रिया सुळे sakal
अकोला

ऐतिहासिक वारसा जतन करणे गरजेचे : खासदार सुप्रिया सुळे

मातृतिर्थ सिंदखेडराजा येथील पर्यटन वाढवण्यासाठी ऐतिहासिक वास्तूचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार आढावा बैठकीत सुप्रिया सुळे यांनी केले.

सकाळ डिजिटल टीम

सिंदखेडराजा : मातृतिर्थ सिंदखेडराजा येथील पर्यटन वाढवण्यासाठी ऐतिहासिक वास्तूचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार आढावा बैठकीत सुप्रिया सुळे यांनी केले. त्याचबरोबर केंद्रीय पुरातत्त्व विभाग व राज्य पुरातत्त्व विभाग या दोघांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

मातृतीर्थ सिंदखेड राजा दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादीच्या खा. सुप्रियाताई सुळे यांनी शहरातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. शहरातील ऐतिहासिक मोती तलाव, रामेश्वर मंदिर, राजे लखोजीराव जाधव समाधी, निळकंठेश्वर मंदिर, रंगमहाल काळा कोट, सावकार वाडा, राजमाता जिजाऊ जन्मस्थळ, पुतळा बारव, चांदणी तलाव यांना भेटी देऊन त्याची माहिती जाणून घेतली. सर्व ऐतिहासिक वास्तूंची सविस्तर माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, अ‍ॅड संदीप मेहेत्रे व विजय तायडे यांनी दिली. खा. सुप्रियाताई सुळे यांच्या दौऱ्यामुळे ऐतिहासिक स्थळाच्या रखडलेल्या कामांना गती मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

यावेळी पं. स. सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे होते. खा. सुप्रीयाताई सुळे यांचा उपयोग दिल्ली दरबारी करून घेतला पाहिजे त्यामुळे त्यांनी सांगितलेले प्रस्ताव तत्काळ पाठविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.यावेळी नगरपरिषदेचे नगरसेवक व महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रीय स्मारकासाठी करणार पाठपुरावा

लोकसभेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर राजमाता मॉ जिजाऊ यांचे जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी लोकसभेमध्ये मागणी करणार आहे. त्याअगोदर राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी लागणार्‍या गोष्टीची पूर्तता करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी यांच्या पाठपुराव्याला यश

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी हे मातृतिर्थ येथे ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी प्रयत्न करत असतात. काही दिवसापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेत याबाबत माहिती दिली होती. प्रत्यक्ष ऐतिहासिक वास्तूची पाहणी करण्याचा आग्रह त्यांनी यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांना केला होता. त्या आश्‍वासनाची पूर्तता केली.

तत्काळ निधी मंजूर करण्याची गरज

राज्य पुरातत्त्व विभागाअंतर्गत पाच कामे मंजूर आहे यामध्ये निळकंठेश्वर महादेव मंदिर, रंगमहल, काळा कोट, सावकार वाडा, आणि लखोजीराव जाधव राजवाडा याचा समावेश आहे. त्यांचे काम २०१८ मध्ये सुरू करण्यात आले होते. संबंधित कंत्राटदाराकडुन कुशल कारागिरांच्या माध्यमातून काम सुरू होते. परंतु संबंधित ठेकेदाराचे ४.१० कोटी रुपये थकीत असल्यामुळे कामे कशी सुरू करावी.असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे तत्काळ निधी मंजूर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT