अकोला

या मुख्यमंत्र्यांमध्ये ती गोष्ट नाही; असे का म्हणाले बावनकुळे?

संजय जाधव

बुलडाणा : मुख्यमंत्री म्हणून खरे काम जर कुणी केले असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी. सकाळी ९ वाजतापासून रात्रीचे ३ वाजेपर्यंत मंत्रालयात, रामगिरीमध्ये आणि वर्षा या निवासस्थानी त्यांनी काम केले. त्यांच्या काळात राज्य विकासाच्या वाट्यावर निघाले होते. खरी विकासाची कामे कुणी केली असेल, तर ती फडणवीस यांनी केली आहे. भविष्याचा वेध घेणारे आणि उत्कृष्ट व्हिजन असणारे मुख्यमंत्री फडणवीस होते. या मुख्यमंत्र्यांमध्ये ती बात नाही, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंचम या संस्थेने सर्व्हे करून उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पसंती दिली आहे, असे विचारल्यावर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. हा सर्वे कुणी केला माहिती नाही. पण असा मुख्यमंत्री पहिल्या पाचमध्ये काय ५० मध्येही येऊ शकत नाही. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत हाहाकार उडाला होता. जिवाच्या भीतीने जनता उपचार मिळविण्यासाठी धडपडत होती. या काळात राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मोठी होती. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १४ महिने मंत्रालयात आलेच नाही. तेव्हा असा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा, असा थेट सवाल करीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेला विचारा

महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेला विचारा, लोकच तुम्हाला सांगतील की, असा मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही आणि पहिल्या पाचमध्ये येणे शक्य नाही. विदर्भात अधिवेशन घ्यायला जे घाबरतात, ते मुख्यमंत्री उत्कृष्ट कसे असू शकतात, असाही सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात मोठी उलथापालथ! इतकी वर्ष संघासोबत असलेल्या भरवशाच्या खेळाडूने साथ सोडली, MS Dhoni...

Trending : आता रात्री होणार नाही अंधार! अंतराळात लागणार ६० फुटांचा आरसा; अमेरिकेच्या प्लॅनने वैज्ञानिक चक्रावले, नेमका विषय काय?

Newly Married Woman : 2 दिवसांनी होतं मुलीचं बारसं, घरात चालू होती तयारी; पण त्याआधीच 23 वर्षांच्या 'या' उच्चशिक्षित माऊलीनं...

Latest Marathi News Live Update : तामिळनाडूमध्ये गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Pune Airport: पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल ‘बिकास’च्या प्रतीक्षेत; दीड वर्षापासून बंद, पुनर्विकासासाठी २४ कोटी रुपयांचा खर्च

SCROLL FOR NEXT