भारतीय रेल्वे संग्रहित छायाचित्र
अकोला

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, आठवड्यातून चार दिवस धावणार हावडा रेल्वे

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) विशेष गाडी पूर्वरत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अकोला येथून हावडा किंवा मुंबई कडे जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. (Howrah train will now run four days a week)

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि रेल्वे द्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटल्यामुळे रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस हावडा लोकमान्य टिळक टर्मिनस सदर विशेष गाडीची वारंवारिता कमी केली होती. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने रेल्वे प्रशासनाने सदर गाडी आठवड्यातून चार दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

त्या अंतर्गत गाडी क्रमांक ०२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा विशेष गाडी ४ जून पासून २९ जूनपर्यंत प्रत्येक सोमवार, मंगळवार , शुक्रवार आणि शनिवारी म्हणजेच आठवड्यातून चार दिवस चालविण्यात येईल. त्यासोबतच गाडी क्रमांक ०२१०२ हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी ६ जून ते १ जुलैपर्यंत सोमवार, बुधवार, गुरुवार आणि रविवारी म्हणजे आठवड्यातून चार दिवस चालविण्यात येईल. सदर दोन्ही रेल्वे गाड्या अकोला रेल्वे स्थानकावरून जाणार असल्याने व त्यांना अकोला रेल्वे स्थानकावर थांबा असल्याने त्याचा फायदा स्थानिक प्रवाशांना सुद्धा होईल. केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांना या विशेष गाडीमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग प्रवासादरम्यान आणि गंतव्य स्थानाच्या वेळी कोरोनाशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

गर्दी कमी करण्यासाठी धावणार आणखी दोन गाड्या
रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हटिया आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-सांतरागाछी दरम्यान विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित साप्ताहिक अतिजलद विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत मुंबई - हटिया विशेष साप्ताहिक अतिजलद (६ फेऱ्या) गाडी क्रमांक ०२४०५ विशेष रविवार १३ जून, २० जून व २७ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ११.०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता हटिया येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०२४०६ विशेष गाडी ११ जून, १८ जून व २५ जून रोजी हटिया येथून १७.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी २३.०० वाजता पोहोचेल. या गाडीला अकोला रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

संपादन - विवेक मेतकर
Howrah train will now run four days a week

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘प्रश्न विचारणं हा विद्यार्थ्यांचा स्वभाव’; ‘छात्रों की गूंज’मधून राहुल गांधींचं पुन्हा सरकारवर टीकास्र, नेमकं काय म्हणाले?

Muslim Family: दहा वर्षांपासून मुस्लिम कुटुंबाच्या घरी गौरीचा जागर; लोहाऱ्यात धार्मिक सलोख्याची अनोखी परंपरा

दीपिका-रणवीरने केली दुसऱ्या बाळाच्या जन्माची घोषणा, 'दुआ' बनली मोठी बहीण; पाहा पोस्टमध्ये काय लिहिलंय

Latest Marathi News Update : ८ महिन्यांची चिमुकली अचानक बेपत्ता; संशयित आरोपीनं संपवलं जीवन

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून २५०० पानी चार्जशीट दाखल

SCROLL FOR NEXT