akola sakal
अकोला

Akola News : नवीन मालमत्ता खरेदी केली आहे, वीज बिल तपासा! अन्यथा...

खरेदी केलेल्या नवीन स्थावर मालमत्तेच्या जागेवरील वीज बील बघा; महावितरणचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

अकोला - वीज पुरवठा संहितेनुसार वीज बिलाच्या थकबाकीसाठी खंडित करण्यात आलेल्या जागेवरील थकीत वीज बिल भरल्याशिवाय त्या जागेवर नवीन वीज जोडणी देता येत नाही.

दरम्यान त्या जागेची विक्रीव्दारे हस्तांतरण झाले असल्यास त्या जागेच्या नवीन मालकाला किंवा वारसदाराला किंवा कायदेशीर प्रतिनिधी असलेल्या व्यक्तीला त्या जागेवरील थकीत वीजबिल भरावे लागणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.

महावितरणकडून पाठपुरावा केल्यानंतरही ग्राहक वीज बिल भरण्याला प्रतिसाद देत नसल्याने परिमंडलाअंतर्गत अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील दोन लाख ३१ हजारांपेक्षा जास्त ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला असून, त्यांच्याकडे २१९ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे.

त्यामुळे वीज बिलाची थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून अशा ग्राहकांचे स्थळ परीक्षण करण्यात येत असताना, महावितरणच्या असे लक्षात आले आहे की, काही ठिकाणी विक्रीदाराकडून ग्राहकांना वीजबिलाची जुनी थकबाकी दर्शविली जात नाही व ग्राहक नवीन नावाने वीजजोडणी घेतो. मात्र, वीज पुरवठा संहितेनुसार वीज जोडणी भोगवटदाराच्या नावाने एखाद्या स्थळावर दिली जाते.

दरम्यान त्या जागेचे विक्री किंवा कायदेशिर हस्तांतर झाले असल्यास वीज नियामक आयोग, वीज पुरवठा संहिता कलम १२.५ नुसार कायम स्वरुपी वीज पुरवठा खंडित असलेल्या जागेवरील येणे थकीत रक्कम त्या जागेचे नवीन मालक किंवा वारसदार किंवा कायदेशीर प्रतिनिधी असलेल्या व्यक्तीकडून वसूल करता येत असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले.

सर्वोच्च न्यायालय काय म्हणते

वीजबिलाची थकबाकी असलेल्या स्थळी नवीन वीज जोडणी देण्यासंदर्भात निकाल देताना जागेची मालकी बदलली तरी, नवीन मालकाकडून पूर्वीच्या वीजबिलांच्या थकबाकीची रक्कम वसूली करण्याचा अधिकार वीज कंपन्यांना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

थकीत रक्कम नवीन जोडणीवर वळती होणार

वीजबिलाच्या थकबाकीसाठी कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित असलेल्या जागेवर थकीत रक्कम न भरता नवीन वीज जोडणी घेण्यात आली असेल तर, त्या जागेवरील वीजबिलाची थकबाकी आणि त्यावरील व्याज हे नवीन चालू असलेल्या वीज जोडणीवर वळती करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News: खताच्या गोणीमागे ३७५ रुपयांपर्यंत वाढ; शेतकऱ्यांना फटका; खरीपपूर्व तयारीत खर्च वाढून आर्थिक गणित कोलमडण्याची भीती

Parbhani News: पालिकेच्या कारभारावर नागरिकांचा संताप; रस्ते, नालेसफाई, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन रखडले

Latest Marathi News Live Update: बुलढाण्यात युवक काँग्रेस विरुद्ध गायकवाड समर्थक आमनेसामने; घोषणाबाजीने तणाव वाढला

Char Dham Yatra: "चारधाम यात्रेची तयारी जबरदस्त!"ऋषिकेशमध्ये सुनील शेट्टीकडून पोलिसांचं कौतुक; अफवांबद्दल काय बोलला ?

Pune Politics: “माणसे फोडणे, पैशाचे राजकारण भाजपचा उद्योग”; संजय राऊतांचा हल्लाबोल, पुण्यातील शिवसेनेचे मारेकरी भाजपच!

SCROLL FOR NEXT