Organic fertilizer sakal
अकोला

रासायनिक खताबरोबरच शेणखताची भाववाढ

जमीन सुपीकता निर्देशांकानंतर शेणखताची वाढली मागणी

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर जैन - या वर्षी रासायनिक खत व बियाण्याचे दर मागच्या वर्षीपेक्षा २० टक्क्यांनी वाढले आहेत. या भाववाढीमुळे शेतकरी हैराण असतानाच शेणखताच्या भावातही मोठी वाढ झाली आहे. जमीन सुपीकता निर्देशांकामध्ये मातीमध्ये नत्र व स्फुरद या अन्नद्रव्यांची कमतरता असल्याने शेण खताची मागणी वाढली आहे.

गत काही वर्षांपासून शेतीत रासायनिक खतांच्या वाढलेल्या वापरामुळे मानवी आरोग्यावर तसेच शेतजमिनीवर दुष्परिणाम होत आहेत. मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांची ही कमतरता जमिनीत असल्याचे जमीन सुपीकता निर्देशांकानुसार समोर येत आहे. जस्त, लोहाची कमतरता जमिनीत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल आता सेंद्रीय शेतीकडे वळला आहे. त्यामुळे शेतकरी शेतात शेणखताचा वापर करीत आहेत, परंतु शेणखताच्या एका ट्रॉलीसाठी तीन ते चार हजार रुपये मोजावे लागत आहेत.

शिरपूर व परिसरात खरीप व रब्बी हंगामात सोयाबीन, तूर, हरभरा, हळद, गहू आदी पिके घेतली जातात. त्यामुळे शेणखताचा वापर जास्त करण्यात येतो. परंतु पशुधनाची संख्या कमी झाली असल्याने शेणखत मिळणे कठीण झाले आहे. ज्याच्याकडे गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या मोठ्या प्रमाणात आहेत किंवा ज्यांनी दुग्ध व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर पशुधन सांभाळले आहे, त्यांच्याकडे शेणखत उपलब्ध आहे. अशांची संख्या कमी व शेणखत घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पशुपालक शेतकऱ्यांना शेणखताला चांगला दर मिळत असल्याने त्याच्या आर्थिक उत्पन्नात मदत होत आहे. अनेक शेतकरी दुग्ध व्यवसाय परवडत नसल्याने पशुधन सांभाळत नाहीत, तसेच ज्या शेतकऱ्याकडे एखाद-दुसरे पशुधन असते ते शेतकरी शेणखत न विकता स्वतःच्या शेतात टाकत आहेत. त्यामुळे शेणखत सहज उपलब्धही होत नाही.

जमिनीचा पोत सुधारतो

शेणखत एकदा टाकल्यास पुढील दोन-तीन वर्ष त्या शेतातील पिकाच्या उत्पादन वाढीस मदत करते. यासोबतच जमिनीचा पोत देखील सुधारतो. मानवी आरोग्याला या खताचा कसलाही धोका नाही. याउलट रासायनिक खतांचा अनेकदा कृत्रिम तुटवडा निर्माण होतो. शिवाय वाढत्या वापरामुळे शेत जमीन नापीक होत आहे. रासायनिक खतांचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो असे तज्ज्ञांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT