अकोला

शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवय वाढवा

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला हवी असलेली ‘गंगाजळी’ उभारण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवण्याचा सल्ला विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी राज्य सरकारला दिला आहे. Increase the retirement age of government employees

डॉ. खडक्कार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणे स्वाभाविक असल्याचे म्हटले आहे. राज्याची महसुली तूट ही नऊ हजार ५११ कोटी रुपये, तर वित्तीय तूट ५४ हजार ६१८ कोटी होण्याची शक्यता आहे. २०२०-२१ दरम्यान महाराष्ट्रचे दरडोई उत्पन्न पण कमी होण्याची शक्यता आहे. कोविडमुळे राज्यातील आरोग्य सेवांवर मोठा ताण पडत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चालू अर्थसंकल्पात १२ हजार ५०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. आणखी खर्च वाढणार आहे.

अशी परिस्थिती असताना राज्य सरकारचे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. निवृत्तीच्या वेळी शासनाला मोठी रक्कम शासकीय कर्मचाऱ्यांना अदा करावी लागते. सध्याची राज्याची आर्थिक परिस्थिती बघता व आरोग्य सेवेसाठी प्राधान्य द्यावे लागत असल्याने, राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षे वाढवावे. त्यामुळे किमान दोन वर्षांसाठी राज्य तिजोरीवरील ओझे कमी होईल आणि राज्य सरकारला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी व आरोग्य सेवा सुधारणांसाठी मोठा निधी उपलब्ध होईल, असे डॉ. खडक्कार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SCROLL FOR NEXT