karanja Malipura Pollution from waste in sewers is increasing
karanja Malipura Pollution from waste in sewers is increasing  
अकोला

अकाेला : दुर्गंधीने माळीपुरावासियांचे नाक मुठीत

सकाळ वृत्तसेवा

कारंजा : गत महिन्यांपूर्वी स्वच्छता अभियानात बाजी मारणाऱ्या कारंजा शहरात आजरोजी मात्र, कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छता अभियानावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात येऊनही कारंजा शहराचे शेवटचे टोक असणाऱ्या माळीपुरा भागात दुर्गंधींसोबतच वराहांचा उपद्रव वाढून नाले कचऱ्याने तुडुंब भरले गेले आहेत. तेव्हा या परिसरातील दुर्गंधी केव्हा दूर होणार, असा प्रश्न स्थानिक मनसे सैनिकांनी नगर परिषदेला दिलेल्या निवेदनातून विचारला आहे. शिवाय, हा प्रश्न त्वरित मार्गी न लागल्यास या परिसराची स्वच्छता मनसेच्या वतीने करुन केरकचरा नगर पालिकेसमोर असा, इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आला आहे.

कारंजा शहरातील जुनी वस्ती तथा स्लॅम एरिया म्हणून, ओळख असलेला माळीपुरा परिसर हे शहराचे शेवटचे टोक आहे. शिवाय, हा परिसर भौगलीकतेनुसार उतरत्या भागात असल्याने संपूर्ण गावाचे सांडपाणी घेऊन जाणारा एक मोठा नाला गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. सोबतच, या नाल्याच्या बाजूलाच गोर-गरीब जनतेने आपल्या निवाऱ्याची व्यवस्था करुन संसार थाटला आहे. मात्र, आजरोजी या भागात कचऱ्याचे ढीग तुडुंब भरलेले नाले यामुळे, या स्लॅम एरियामध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरुन ठिकठिकाणी कचरा इतस्ततः पसरला आहे. त्यामुळे, दुर्गंधी सुटून स्थानिक रहिवाशी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर, या मार्गावरुन जाणाऱ्या वाटसरूंना नाक मुठीत धरुन मार्गक्रमण कराव लागत आहे.

शिवाय, यामुळे, डासांचे प्रमाण वाढले असून साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त अगोदर अगोदरच या परिसरातील गोरगरीब जनता वैश्विक महामारी कोरोना या आजाराच्या आर्थिक, शारीरिक त्रासाच्या बाहेर पडत असतांनाच त्यात या नाल्यासह परिसराची सफाई होत नसल्याने नागरिक मेटाकुटीस आले आहे. मात्र, कारंजा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी हा जटिल प्रश्न उचलून धरुन स्थानिक नगर परिषेदला निवेदन सादर केले आहे. शिवाय, नगर पालिकेने तातडीने दखल घेऊन या परिसराची येत्या पाच दिवसात स्वच्छता करावी. अन्यथा मनसे सैनिक या परिसराची स्वच्छता करुन तो कचरा नगर पालिकेसमोर टाकण्यात असा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी मनसेचे रवि राऊत, सतेन्‍द्र बंदिवान, दिनेश गायकवाड, शंकर घोडे, रवि मुळतकर, मंगेश ईश्वरकर, दत्ता लवंगे आदींसह इतरही मनसे पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

‘स्वच्छ कारंजा- सुंदर कारंजा’ संकल्पनेला पालिकेकडून तिलांजली

स्वच्छ कारंजा सुंदर कारंजा ही बिरुदावली घेऊन नगर पालिकेने मोठा गाजावाजा करुन कारंजा शहरात शासनाकडून स्वच्छतेचा निधी निघेस्तोर हे अभियान चालवले. मात्र, गेल्या काही महिन्यापूर्वी स्वच्छ भारत अभियानाचा निकाल लागला यामध्ये, कागदावर क्रमांक पटकावून दुर्गंधी रस्त्यावर अशा, प्रकारची परिस्थिती आजरोजी कित्येक महिन्यांपासून पाहावयास मिळत आहे. शिवाय, माळीपुरा परिसरात बहुतांश नागरिक हातमजुरी करणारे असल्याने याभागात सकाळच्या वेळी घंटागाडीधारक आपली पाठ फिरवत असल्याची चर्चा नागरिक करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT