Lack of calcium in the body due to junk food
Lack of calcium in the body due to junk food 
अकोला

जंकफूडमुळे विद्यार्थ्यांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर जैन : पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण, बदलती जीवनशैली, मॉडर्न लाइफस्टाइल जपण्याच्या नावाखाली जंकफूड खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. या सोबतच आहारातील पोषक तत्वांची कमतरता, स्थूलता अशा अनेक कारणांमुळे लहान मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता दिसू लागली आहे. त्यामुळे पालकांनी सतर्कता बाळगत मुलांच्या कॅल्शिअम गरजेकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.

सर्वत्र छोट्या-मोठ्या हॉटेलमधील सर्वात जास्त विकले जाणारे पदार्थ म्हणजे जंकफूड! लहान मुलांपासून तो जेष्ठांपर्यंत अनेक जण आवडीने जंकफूड खातांना दिसून येतात. परंतु अनेक लहान मुले जंकफूड शिवाय इतर काही खातच नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत, यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकते, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

लहान मुलांमध्ये वाढत्या वयासोबत हाडे आणि दातांचा विकास होत असतो. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास हाडे ठिसूळ होणे, दात लवकर तूटणे असे परिणाम दिसून येतात. यासोबतच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हात आणि पायाला मुंग्या येणे, अशक्तपणा जाणवणे, स्नायू कमकुवत होणे अशा समस्या उद्भवतात.

आता ऑनलाइन शाळा सुरू असल्याने पाल्य आपल्या पालकांना जंकफूड खाण्यासाठी हट्ट धरत आहेत. शेवटी हट्टापायी पालकही हे जंकफूड आपल्या पाल्याना खाण्यास देतात, मात्र याच्या अतिसेवनाने याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

''जंक फूड खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बॉडी मॉस्क इंडेक्‍स वाढतो, परिणामी शरीरातील स्केलेटवर ताण येतो. अशा वेळेस व्यायाम न करणे, फिरायला न जाणे याचा परिणाम होऊ शकतो.जंक फूडमध्ये अनहेल्दी फॅटचे प्रमाण अधिक असल्याने आहारात कॅल्शिअमचे अबसोप्शन व्यवस्थित होत नाही परिणामी हाडे ठिसूळ होतात.''

- डाॅ. अनिल कावरखे, वाशीम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi News: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट, सर्च ऑपरेशन सुरु

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Meta AI : व्हॉट्सअ‍ॅपवर कसं वापरायचं 'मेटा एआय'? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

"लग्न म्हणजे केवळ नाच-गाणी नाही.. आवश्यक विधींशिवाय झालेला हिंदू विवाह अमान्य"; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Share Market Holiday: आज महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार का? पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT