अकोला

आजपासून वर्दळ; बाजार दुपारी दोन वाजेपर्यंत अनलॉक!

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्ह्यात कोरोना संसर्गाची (Corona Virus in Akola) गती कमी झाल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवार (ता. १ जून) पासून जिल्ह्यातील सर्व बिगर अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७ वाजतापासून दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यासोबतच सर्वच बॅंकां सुद्धा सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मंगळवारपासून रस्त्यांवर वाहनांच्या गर्दीसह दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळेल. असे असले तरी बिगर अत्यावश्यक सेवेची दुकाने शनिवारी व रविवारी मात्र पूर्णतः बंद राहतील. (Lockdown opens in Akola from today; Market unlocked until 2 p.m.)


कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शासनाकडून प्राप्त सुचनांच्या आधारे जिल्ह्यात १४ एप्रिलपासून कडक निर्बंध लावले होते. त्याअंतर्गत अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली होती. परंतु आता २३ मे पासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे. त्यासोबतच जिल्ह्यातील कडक निर्बंध १ जूनच्या सकाळी ७ वाजतासंपत असल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शासनाकडून प्राप्त नव्या निर्देशाच्या आधारे मंगळवार (ता. १ जून) पासून जिल्ह्यातील सर्वच बिगर अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मंगळवारपासून जिल्ह्यातील सर्वच दुकाने सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

निर्बंधांसह सुरु ठेवण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा
- सर्व प्रकराची जीवानावश्यक दुकाने - सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत.
- महापालिका तसेच शहरी व ग्रामीण भागातील बिगर अत्यावश्यक दुकाने - सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) शनिवारी व रविवारी पूर्णतः बंद.
- भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने (द्वार वितरणासह) - सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत.
- दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री - सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत व सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत.
- कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने - सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत.
- सर्व राष्ट्रीयकृत, खासगी, बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था - सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत.
- पेट्रोल पंप, डिझेल, सीएनजी गॅस पंप - सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत.
- रॅस्टारेंट, भोजनालय, उपहारगृह - सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत (फक्त होम डिलेव्हरी)
- कृषी उत्पन्न बाजार समिती - सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत.

दुपारी ३ नंतर घराबाहेर पडण्यास बंदी
जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या आदेशात कोणत्‍याही व्‍यक्‍तीस अत्‍यावश्‍यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्‍यास दुपारी तीन वाजेनंतर पूर्णतः बंदी घातली आहे, तसा उल्लेख त्यांच्या आदेशात करण्यात आला आहे. त्यासोबतच सार्व‍जनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने बगीचे पूर्णतः बंद राहतील. सर्व केशकर्तनालय, सलून, स्‍पा, ब्‍युटीपार्लर संपूर्णतः बंद राहतील. शाळा महावद्यिालय, शैक्षणिक संस्‍था, प्रशिक्षण संस्‍था सर्व प्रकारची शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील. ऑनलाईन शिक्षणास प्रतिबंध राहणार नाही.

यांनाही मिळाली परवानगी
- मद्य विक्री सकाळी ७ ते दुपारी २ या कालावधीत करता येईल.
- सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालय व आस्‍थापना या कालावधीत २५ टक्के कर्मचारी क्षमतेसह सुरु राहतील.
- सर्व आपले सरकार केंद्र व सेतू केंद्रे, आधार केंद्र २ वाजेपर्यंत सुरु राहील.
- उक्‍त कालावधीत नागरिकांसाठी दस्‍त नोंदणीचे कामकाज सुरु राहतील.
- सर्व सार्वजनिक तसेच खासगी बस वाहतूक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहने यांची वाहतूक नागरिकांना अत्‍यावश्‍यक कामाकरिता फक्‍त अनुज्ञेय राहील. अत्‍यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील. तसेच रूग्‍णाकरीता रिक्षा व खाजगी वाहनास परवानगी राहील.
- आवश्यक नसलेल्या वस्तू ई-कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील. ई-कॉमर्स मार्फत घरपोच सेवा सुरू राहतील. तसेच स्‍थानिक दुकानदार, हॉटेल यांचे मार्फत घरपोच सेवा पुरवणारे कामगार यांचे कडे ग्राहकांच्‍या घरी जातांना बिल व संबधित दुकानदारामार्फत देण्‍यात येणारे ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

संपादन - विवेक मेतकर

Lockdown opens in Akola from today; Market unlocked until 2 p.m.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयारी होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

Accident News : पुण्यात कल्याणीनगर येथे भीषण अपघात, दोघांना चिरडले,अल्पवयीन कारचालक ताब्यात

Sharmistha Raut : "माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायचे"; घटस्फोटाच्या त्या प्रसंगावर व्यक्त झाली शर्मिष्ठा

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT