maharashtra hsc exam start from today Board of Secondary and Higher Secondary Examinations
maharashtra hsc exam start from today Board of Secondary and Higher Secondary Examinations sakal
अकोला

बेस्ट ऑफ लक : आजपासून बारावीची परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने यंदा इयत्ता बारावी व दहावीची ऑफलाईन परीक्षा घेण्यात येत आहे. इयत्ता बारावीची परीक्षा शुक्रवार, ता. ४ मार्चपासून प्रारंभ होत आहे. या परीक्षेला अकोला जिल्ह्यातील १८० केंद्रांवरून २६ हजार ८७३ विद्यार्थी बसणार आहेत, अशी माहीती अमरावती विभागीय परीक्षा मंडळाचे सचिव उल्हास नरड यांनी दिली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी इयत्ता बारावी व दहावीची परीक्षा घेण्यात आली नव्हती. त्यामुळे अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारेच विद्यार्थ्यांना गुणदान करून उत्तीर्ण करण्यात आले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे परीक्षा मंडळाच्यावतीने दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. ता. ३ मार्चपर्यंत परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे स्वीकारण्यात येत होती. यापूर्वी बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यात ८५ केंद्र असायची. राज्य शासनाने परीक्षेसाठी बदल केला असून, आता शाळा तेथे परीक्षा केंद्र दिले आहेत. अर्थातच १५ पेक्षा अधिक विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दहावी व बारावीची परीक्षा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात बारावीच्या परीक्षा केंद्रात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकूण १८० परीक्षा केंद्रावर बारावीचे २६ हजार ८७३ विद्यार्थी परीक्षा देणार आहे.

दहावीची परीक्षा १५ मार्चपासून

दहावीची परीक्षा १५ मार्चपासून होणार आहे.दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यातून २५ हजार ९१५ विद्यार्थी प्रविष्ट होणार असून, त्यासाठी तब्बल ४३८ केंद्र आहेत. त्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने परीक्षा केंद्रनिहाय नियोजन केले असून, केंद्रांवर केंद्र प्रमुख, पर्यवेक्षकसुद्धा नियुक्त करण्यात आले आहेत.

बसेस उपलब्ध करून देण्याची विनंती

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील आगार व्यवस्थापकांना ता. १ मार्च २०२२ रोजी पत्र देवून परीक्षेसाठी जाणाऱ्या विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे यासाठी बस उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. विद्यार्थ्यांकरिता गाव ते परीक्षा केंद्राकरिता विशेष गाड्या सोडण्याची मागणीही या पत्रात केली आहे. परीक्षेच्या सोयीनुसार गाड्यांचे वेळापत्रकात आवश्यक ते बदल करणे, परीक्षा केंद्रावर जाणारा विद्यार्थी मार्गावर दिसल्यास व त्याने गाडी थांबविण्याची विनंती केल्यास बस थांबवून विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा उपलब्ध करून देण्याची विनंतीहीया पत्रात करण्यात आली आहे.

लेखी परीक्षेसाठी १५ ते ३० मिनिटे अधिक वेळ

बारावीची परीक्षा ४ ते ३० मार्चदरम्यान होत आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांना लिखानाचा सराव मिळाला नाही. ही अडचण लक्षात घेवून लेखी परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना पुरेशा वेळ मिळावा म्हणून वेळ वाढवून देण्यात आला आहे. त्यानुसार ७० ते १०० गुणाच्या पेपरसाठी ३० मिनिट अधिक वेळ तर ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे अधिक वेळ मिळणार आहे. या वाढीव वेळेसह दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणारी वेळेची सवलत कायम राहणार आहे.

अशी आहे बारावीची विद्यार्थी संख्या

नियमित विद्यार्थी

  • मुले ः १३ हजार ९३१

  • मुली ः १२ हजार ४१

  • तृतीयपंथी ः दोन

एकूण ः २५ हजार ९७४

पुनर्परीक्षा देणारे विद्यार्थी

  • मुलंः ६६७

  • मुली ः २३२

एकूण ः ८९९

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी संख्या ः २६ हजार ८७३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT