अकोला

मराठा आरक्षणासाठी समाजाने रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही-नरेंद्र पाटील

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः मराठा समाजाला भाजपच्या सत्ता काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण मिळवून दिले होते. मात्र, विद्यमान महाविकास आघाडी सरकारला ते टिकविता आले नाही. उलट चोराच्या उलट्या बोंबा सुरू असून, मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावणे काम महाविकास विकास आघाडी सरकार करीत असल्याचा आरोप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केला. आरक्षणासाठी आता समाजाने रस्‍त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, भाजप या आंदोलनाल पूर्ण साथ देईल, असे पाटील यांनी अकोला येथे पत्रकार परिषदेत सांगितले. (Maratha Reservation BJP Press Council Akola Narendra Patil)


यावेळी बोलातना नरेंद्र पाटील यांनी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज रस्त्यावर आल्याशिवाय महाविकास आघाडी सरकार हे डोळे उघडणार नाही, असा सांगितले. लोकशाही पद्धतीने मराठा समाज आपला लढा उभारणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्र यावे, अशी हाक त्यांनी दिली.

मराठा महासंघाचे संस्थापक आमदार स्व. अण्णासाहेब पाटील याचे चिरंजीव व माथाडी कामगार नेते तथा अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाज नेत्यांच्या भेटीगाठीसाठी व आंदोलनाची दिशा ठरविण्याकरिता विदर्भ दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी अकोला येथे मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांसोबत बैठक घेतल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला


मुख्यमंत्र्यांचीच इच्छा नाही
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात जे प्रयत्न झाले त्यामुळे हायकोर्टात आरक्षण टिकले. मात्र, विद्यमान महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छा नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या वेळी त्यांनी योग्य समन्वय राखला नाही, असा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला.

ज्यांना आरक्षण कळले नाही, ते समन्वयक
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना काँग्रेसचे अशोकराव चव्हाण यांच्याकडे जबाबदारी होती. काँग्रेसने कधीच मराठ्यांना आरक्षण दिले नाही. त्यामुळे आरक्षण काय आहे, हेच अशोकरावांना कळले नसल्याचा आरोपही नरेंद्र पाटील यांनी केला.

आंंबेडकरांची भूमिकात सतत बदलेली
वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका सतत बदलेली आहे. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी वेळोवेळी केलेल्या भाष्यात फरक आहे. आता आरक्षण संपले आणि मिळूच शकणार नाही, हे स्पष्ट झाले तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

Maratha Reservation BJP Press Council Akola Narendra Patil

संपादन - विवेक मेतकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; जाणून घ्या बेंगळुरू-चेन्नईची प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT