अकोला

माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

मानोरा (जि.वाशिम) : नवीन चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरवरून एक लाख रुपये आण, असा तगादा लाऊन विवाहितेचा शारीरिक व मानसीक छळ सासरची मंडळी करित असल्याची तक्रार फिर्यादीने दिली. त्यावरून मानोरा पोलिसांनी सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी महिलेच्या जबानी रिपोर्टप्रमाणे, लग्न झाले तेंव्हापासून सासरची मंडळी शारिरिक व मानसीक छळ करीत असूनही त्याकडे ती दुर्लक्ष करीत सुखाने संसार करीत होती. दोन मुले झाली तरीही त्रास वाढला. पती सूरज गायकवाड रा.अंतरगाव, ता.दारव्हा हा मोटर ड्रायविंगचे काम करीत असल्याने त्याला स्वतःची नवीन चारचाकी गाडी घ्यायची आहे.

त्यासाठी माहेरवरून एक लाख रुपये आण, असा तगादा लाऊन पतीसह अन्य सात जणांकडून मारहाण केली जात होती. त्यामुळे त्रास सहन होत नव्हता, अशा जबानी रिपोर्ट व महिला समुपदेशन केंद्र कारंजा यांचे अहवालावरून मानोरा पोलिसांनी पती सुरज अन्य सात जणांविरुद्ध कलम ४९८, ५०४, ५०६ भादवीप्रमाणे गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणाचा अधिक तपास मानोरा पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Impact on Rabi Crops : एल निनोचा विळखा! रब्बी हंगामात अन्नधान्य उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता; कृषी सचिवांनी व्यक्त केली चिंता

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापुरात बिबट्याची दहशत! थेट फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर झेप घेत उसाच्या शेतात शिरला, मानवी वस्तीत भीतीचं वातावरण; वन विभाग-पोलिस यंत्रणा सतर्क

IIT Bombay Case: कॉपी केल्याचा साहिलला पश्चात्ताप, मित्र-मैत्रिणीला फोन केल्याचे पोलिस तपासात उघड

Marathi News Live Updates: अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा चोरट्यांनी घेतला फायदा; लालबागचा राजा, परळ आणि गिरगाव चौपाटी परिसरात चोरीच्या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी वाढली

ढिंग टांग : आत्ता होता, गेला कुठे..?

SCROLL FOR NEXT