NCP Merger News : बापाच्या टीकेवर लेकीचं उत्तर! सुनिल तटकरेंवर होत असलेल्या टीकेवर अदिती तटकरेंचे स्पष्टीकरण; राष्ट्रवादी विलीनीकरण होणार का?

Maharashtra Politics : सुनील तटकरे यांच्यावर होत असलेल्या टीकेला मंत्री अदिती तटकरे यांनी उत्तर दिले आहे. विलीनीकरणाबाबतचा निर्णय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
NCP Merger News Maharashtra Politics

NCP Merger News Maharashtra Politics

esakal

Updated on: 

NCP Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरून राजकीय वातावरण तापले असताना मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसाठी आपल्याला कोणतेही निमंत्रण नव्हते. तसेच विलीनीकरणासंदर्भातील बैठकीबाबतही आपल्याला कोणताही फोन आला नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सुनील तटकरे यांना विनाकारण खलनायक ठरवले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...