More two new world records by Amol Anasane clapping for clapping with one hand sakal
अकोला

एका हाताने टाळी वाजविणाऱ्या अमोल अनासनेचे दोन नवीन विश्वविक्रम

सकाळ वृत्तसेवा

अकोला : एका हाताने टाळी वाजत नाही, ही पूर्वापार चालत आलेली प्रचलित म्हण खोठी ठरवून एका हाताने टाळी वाजवून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विश्व विक्रमांचे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या अकोला येथील जुन्या शहरातील अमोल अनासने या युवकाने दोन नवीन विश्वविक्रम आपल्या नावावर नोदविले आहेत.

अमोलला ‘वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया’ या विक्रमाची नोंद करणाऱ्या संस्थेने दोन विक्रमांचे सर्टिफिकेट, दोन मेडल व बॅच देऊन सन्मानित केले आहे. यामुळे त्याच्या विक्रमांच्या खजिन्यात आणखी दोन महत्त्वपूर्ण पुरस्कारांची भर पडली आहे. या विक्रमात ‘फास्टेस्ट वन हँड क्लापिंग इन ए मिनिट’ व एका हाताने एका मिनिटात ३०० पेक्षा जास्त टाळी वाजवून रेकोर्ड बनवले आहे. ‘मोस्ट अल्टरनेट वन हँड क्लापस इन वन मिनिट’ यात एका मिनिटात दोन्ही हाताने सर्वांत जास्त ४०० पेक्षा जास्त टाळी वाजवून विक्रम नावर केला आहे.

हा जागतिक विक्रम ठरला आहे. अमोलने या विक्रमाची व्हिडिओ क्लिपिंग वर्ल्ड रेकॉर्डस इंडियाला देत हा विक्रम ता. २१ऑगस्ट २०२१ ला केला होता. वर्ल्ड रेकॉर्डची नोंद ता.१० डिसेंबर २०२१ रोजी वर्ल्ड रेकॉर्डस इंडियातर्फे घेण्यात आली. त्यांच्या वेबसाईटला या विक्रमाची माहिती प्रसिद्ध केली आहे. अमोलला वर्ल्ड रेकोर्ड इंडिया व जिनियस फाउंडेशनचे मुख्य संपादक पवन सोलंकी यांच्या तर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. अमोलने या आधी नॉन स्टॉप वन हँड क्लापिंग रेकोर्ड केला होता. अमोलने नॉन स्टॉप एका हाताने एक तासात सात हजार टाळी वाजवून विश्व विक्रम केला होता. एका हाताने टाळी वाजत नाही ही पूर्वापार चालत आलेली प्रचलित म्हण खोटी ठरवली होती. ज्या लोकांना एक हात आहे. त्यांच्या करिता ही कला प्रेरणा दायी ठरू शकते. आतापर्यंत अमोलने तीन विक्रम केले आहेत.

अमोल अनासने यांना इंटरनेशनल आयकॉन २०२२ मिळाला असून, इंडियन आयकॉन अवॉर्ड २०२२ पुरस्कारही मिळाला आहे. इंडिया स्टार रिपब्लिक अवॉर्ड २०२२ पण मिळाला असून, अमोल आतापर्यंत २३ वर्ल्ड रेकॉर्डचे सर्टिफिकेट व २८ पेक्षा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विक्रमांचे पुरस्कार आहे व आतापर्यंत अमोलकडे ६३ सर्टिफिकट आहेत. या पुरस्कारांमुळे महानगराचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे. अमोलच्या या उपलब्धी बद्दल त्याचे नगरसेविका मंजुशा शेळके, विलासराव अनासाने, ॲड. मुन्ना खान, नितीन लोया, रमेश वानखडे, राजेंद्र बंब, सचिन ठोसर, ॲड. दुशांत चौहान, अशोक उंबरकार,गजानन उज्जैनकर,मधुकर रत्नपारखी,महेंद्र दैवैज्ञ,महेंद्र मोहोकार समवेत वीर हनुमान व्यायाम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT