मूग e sakal
अकोला

मुगाला मिळतोय चांगला भाव, आवकही वाढली

सकाळ वृत्तसेवा

खामगाव (जि. बुलडाणा) : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Khamgaon APMC) यंदाच्या खरीप हंगामातील नवीन मूग शेतकरी विक्रीस आणत आहेत. २३ ते २८ ऑगस्ट या सहा दिवसांच्या कालावधीत ५८४ पोते मूग विक्रीस आला होता. गत वर्षीच्या तुलनेत चांगल्या दर्जाच्या मुगाला ४०० रुपये अधिक भाव (mung rate) आहे. गत वर्षी चांगल्या दर्जाच्या मुगाला ७ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आला होता.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन मूग खरेदीचा शुभारंभ २३ ऑगस्ट रोजी झाला. शुभारंभाच्या दिवशी ४४ पोते विक्रीस आले होते. खामगाव बाजार समितीत जिल्ह्यातील घाटावरील व घाटाखालील शेतकरी मूग विक्रीस आणत आहेत. मुगाला भाव चांगला मिळतो आणि सायंकाळपर्यंत विकलेल्या मुगाचे पैसेही त्याच दिवशी हातात येतात. त्‍यामुळे शेतकरी खामगाव बाजार समितीला प्राधान्‍य देत आहेत. साधारणतः नवीन मूग ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बाजार समितीत विक्रीस येतो. सप्टेंबरमध्ये मुगाची आवक अधिक असते. याच महिन्यात नवीन उडीद शेतकरी विक्रीस आणतात. मूग व उडदाची विक्री करून त्यातून मिळालेल्या पैशांतून शेतकरी सण साजरे करतात. येथील बाजार समितीत धान्याची आवक बाराही महिने असते परंतु, नवीन उडीद, मूग आला की हळूहळू आवक वाढत जाते. दिवाळीपर्यंत अधिक आवक असते. त्यानंतर आवक कमी होत जाते. सध्या बाजार समितीमध्ये अधिक प्रमाणात धान्याचे ढीग दिसून येत आहेत. तसेच धान्याची आवक वाढल्याने हमाल, मापारी व अन्य मजुरांना चांगली मजुरी मिळत आहे.

सहा दिवसांच्या कालावधीत मुगाची आवक

दिनांक कमी भाव जास्त भाव आवक

  • २३ ६००० ७ हजार १४४ क्विं.

  • २४ ६५०० ७५०० २४ क्विं.

  • २५ ४ ६०० ७ ४०५ ३७ क्विं.

  • २६ ५१२५ ७ ५०० ६९ क्विं.

  • २७ ६००० ७००० २८९ क्विं.

  • २८ ६२०० ७ ३०० ११९ क्विं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT