Akola Businessman beating threat 
अकोला

Nupur Sharma Controversy : नूपुर शर्माच्या समर्थनात पोस्ट टाकल्याने व्यावसायिकाला मारहाणीची धमकी!

कारवाईच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेची जिल्हाधिकारी कार्यालयात धाव

सकाळ वृत्तसेवा

nupur sharma controversy : नूपुर शर्माच्या ( nupur sharma ) समर्थनात समाजमाध्यमावर म्हणजेच व्हॉट्सअपवर ‘स्टेट्स’ ठेवल्याने अकोल्यातील एका व्यावसायिकाला मारहाण व धमकी देण्यात आल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे. यासंबंधी विहिंपने सोमवारी निवासी उपजिल्हाधिकऱ्यांना निवेदन देवून याप्रकरणीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

विशिष्ट धर्माच्या भावना दुखावतील असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा सर्वत्र निषेध नोंदविण्यात येत आहे. मात्र, नूपुर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने काही दिवसांपूर्वी अमरावती येथील मेडीकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच अकोल्यातही नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ व्हॅट्सॲपवर स्टेटस ठेवल्याने एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे.

याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना पंतप्रधानांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनावर विश्व हिंदू परिषदेचे विभागमंत्री सूरज भगेवार, महानगर उपाध्यक्ष प्रकाश घोगलिया, प्रखंड अध्यक्ष सुरेंद्र जयस्वाल, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक हरिओम पांडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनानुसार काला चबुतरा परिसरातील एका व्यावसायिकाने नूपुर शर्मा यांचे समर्थन करतो असे स्टेट्स ठेवले. मात्र, यात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे वाक्य, चित्र नव्हते. तरीही काही युवकांनी त्या व्यावसायिकास त्यांच्या दुकानावर जाऊन मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विहिंपकडून करण्यात आला आहे.

तीन दिवस दुकान होते बंद

भीतीपोटी या व्यावसायिकाने तीन दिवस आपलं दुकानही बंद ठेवले होते. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदविण्यात आली. याप्रकरणी तातडीने पाऊले उचलून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT