Dengue And Chikungunya Patients esakal
अकोला

लहान मुले फणफणली, कोरोनाची भीती, रिसोड येथे डेंगूचे थैमान

सकाळ वृत्तसेवा

रिसोड ः शहरात मागील महिन्याभरापासून ‘डेंगू’ने थैमान घातले आहे. १ ते १४ वर्षे वयोगटातील जवळपास दीडशे मुलांना डेंगूची बाधा झाली आहे. नगरपरिषदेकडून युद्धपातळीवर उपायोजना केल्या जात असून, चार मशीनद्वारे धूर फवारणी करण्यात येत आहे. नागरिकांनी आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे. २५ जून रोजी वाशीम येथील हिवताप निर्मूलन पथकाने शहराची पाहणी केली आहे. (Outbreak of dengue mosquitoes at Risod)


कोरोनाचे संकट कायम असतानाच लहान मुलांना डेंगू होत असल्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. १ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना हा आजार होत आहे. मागील महिनाभरापासून दीडशेच्यावर बालकांना डेंगू आजार झाला आहे. आजही शहरात वेगवेगळ्या रुग्णालयात २५ ते ३० बालके उपचार घेत आहेत. २५ जून रोजी वाशीम येथील हिवताप निर्मूलन पथकाने शहराची पाहणी केली. सर्वाधिक रुग्ण जुन्या शहरात आढळून आल्याची माहिती नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.

नगरपरिषदेकडून याबाबत युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. शहरात चार मशीनद्वारे धूर फवारणी केल्या जात आहे. नागरिकांनी आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा तसेच डेंगूची उत्पत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अनावश्यक पाणीसाठा, उन्हाळ्यात लावलेले कुलर त्वरित काढून घ्यावे. डेंगूची उत्पत्तीस्थळे नष्ट करावी, लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सध्या आजार लहान मुलांमध्येच आहे. कोरोनाची व डेंगूची लक्षणे वेगवेगळे आहेत. पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. बालकांना पूर्ण कपडे घालावे. मच्छर चावणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी. परिसर स्वच्छ ठेवावा. आजाराची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- डॉ. प्रताप डव्हळे, बालरोग तज्ज्ञ, रिसोड

आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. अनावश्यक पाणीसाठा करू नये. डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करावीत. नगरपरिषदेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. आजाराचे प्रमाण कमी होत आहे.
- गणेश पांडे, मुख्याधिकारी नगर परिषद, रिसोड

Outbreak of dengue mosquitoes at Risod

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT