A papaya orchard has been destroyed in a storm in Alegaon.jpg
A papaya orchard has been destroyed in a storm in Alegaon.jpg 
अकोला

वादळी वार्‍यात पपई फळाचा मळा उद्ध्वस्त

सकाळ वृत्तसेवा

घाटबोरी (बुलडाणा) : मेहकर तालुक्यामधील अंजनी बुर्दुक सर्कलमधील आलेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी गोपाल विश्वनाथ कुटे यांच्या एक एकरातील तर किरण परशराम साखरे यांच्या दीड एकरातील मालकीच्या असलेला पपईचा मळा वादळीवार्‍यात गारपिटमध्ये उद्ध्वस्त झाला आहे.

गारपिटीने रब्बी पिकांचे अतोनात नुकसान
 
कोरोना व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. १९ मार्चला रात्री ८ वाजता अचानक अवकाळी पावसाने पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासह मेहकर तालुक्यामधील काही परिसर झोडपून काढले आहे. त्यामुळे रब्बीपिकांचे कांदा, भाजीपाला, फळांच्या पिकांसह नुकसान झाले आहे. शेतकरी गोपाल विश्वनाथ कुटे यांच्याकडे एकच एकर शेती असून त्या शेतात भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया डोणगांव शाखेचे ४० हजार रुपये कर्ज काढून शेतात तायवान पपईची १ हजार रोपाची जून महिन्यात लागवड केली होती. 

कोरोनाच्या संकटात मार्केटमध्ये ठेकेदारच मिळत नसल्याने पपई विक्रीसाठी लांबणीत पडली होती. परंतु, अचानक १९ मार्चच्या रात्री विजांच्या कडकडाटासह गारपीटमध्ये, वादळी वार्‍यात या अल्पभूधारक शेतकरी गोपाल कुटे यांचा पपईचा मळा काही क्षणातच उद्ध्वस्त झाला आहे. उत्पन्नाअभावी घेतलेले बँकेचे व उसनवारीचे पैसे फेडायचे कसे असा प्रश्न या शेतकर्‍यांना सतावू लागला आहे. मेहनत घेऊन निसर्गापुढे हतबल होण्याची वेळ शेतकर्‍यावर आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यांतून अश्रुचे बांध फुटले होते. हे शेतकरी शासन-प्रशासनाकडे मदतीची आर्तहाक देत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट व्हाट्सअप अकाऊंट; नागरिकांकडे पैशांची मागणी

आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? जलवाहिन्या टाकल्या परंतु पाण्यावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT