Police raid Gavran Moha liquor distillery akola
Police raid Gavran Moha liquor distillery akola sakal
अकोला

अकोला : गावराण मोहा दारू भट्टीवर पोलिसांचा छापा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने शनिवारी (ता. १२) गावराण मोहा दारू गाळणाऱ्या पातूर नंदापूर येथील निर्गुडा नदी पात्रातील अवैध दारू भट्टीवर छापा मारला. यावेळी पोलिसांना चार आरोपींना अटक करून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शना खालील विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी (ता. १२) पातूर नंदापूर येथील निर्गुडा नदीपात्रात अवैधरित्या मोहा दारू भट्टीवर छापा मारला.

यावेळी पोलिसांना आरोपी बालकृष्ण उत्तम खंडारे, बबन अंबादास वाकपनजर, प्रीतम राजेंद्र चक्रनारायण, भगवान उत्तम भगत यांनी चार वेगवेगळ्या ठिकाणी गावरण दारू गाळण्याच्या भट्ट्या लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी सदर भट्ट्यांवर कारवाई करत २०० लिटर मोहा दारू, ५०० लीटर मोहा सडवा, ६० हजार रूपये किंमतीचे इतर साहित्य तसेच २०० नग देशी दारू तसेच ७० डब्बे मोहा दारूचे प्रत्येकी २० लीटरने भरलेले असा एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. सर्व आरोपींच्या विरोधात पोलिस स्टेशन पिंजर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT