Tree Collapse in Akola  sakal
अकोला

Akola Rain : पहिल्याच पावसाने उडाली दाणादाण; महाकाय वृक्ष कोसळले

अकोला महापालिकेचे पितळ पडले उघडे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - मृग नक्षत्राच्या पुर्वसंध्येला शहरात वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वारा आणि पावसामुळे अकोला शहरात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.

शहरातील तोष्णीवाल लेआउटमधील महाकाय वृक्ष विद्युत खांबावर कोसळला. यामध्ये विद्युत खांब वाकला. तसेच शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांच्या सायकल, मोटर सायकल या झाडाखाली दबल्या. मान्सून पूर्व बरसणाऱ्या या पावसाने जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सुद्धा शेतीच नुकसान केले आहे. सुमारे पंधरा मिनिट सुरू असलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडाली होती.

अचानक सुरू झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे शहरातील खुले नाट्यगृह जवळील लावलेलं हॉर्डींग सुद्धा वाकून गेले. तर तोष्णीवाल लेआउट मधील रस्त्याच्या बाजूला असलेला एक विशाल झाड उन्मळून खाली पडलं आहे. खाली कोसळलेल्या या झाडाखाली सुमारे १० दुचाकी वाहन आणि सायकली दबली आहेत तर काही दुचाकी गाड्यांचा मोठा नुकसान देखील झाले आहे.

अग्निशमन दलाच्या मदतीने हे झाड हटविण्याच कार्य सुरू आहेय. तर विजेचे तार तुटल्याने या भागाचा विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे. या वादळी पावसात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. गोरक्षण रोडवरील पाटबंधारे विभाग कार्यालय समोरील होर्डींग कोसळले.

भाजप नेते हरिश आलीमचंदानी यांच्या टिव्ही एस शोरूम समोरील मुरली चहा सेंटर जवळील वृक्ष उन्मळून पडले. यामुळे या भागातील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. आजच्या या पावसाने शहरातील अनेक भागात मोठे नुकसान केले आहे.

घुसर, दहीगाव गावंडे परिसरात पाऊस

अकोला तालुक्यातील घुसर, दहिगाव गावंडे, आपातापा परिसरात चांगला पाऊस झाला. मृग नक्षत्र शुक्रवारपासून सुरु होत असल्याने शेतकरी प्रफुल्लीत झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारमधील मंत्र्याचा राजीनामा, राष्ट्रपतींकडे सोपवलं राजीनाम्याचं पत्र

१२ चौकार, १३ षटकार! वैभव सूर्यवंशीच्या भीडूचे ३२ चेंडूंत शतक; राजस्थान रॉ़यल्सचा फलंदाज IPL 2027 मध्ये यशस्वी जैस्वालच्या जागी खेळणार?

Chhatrapati Sambhajinagar: १८ दिवसात २० छापे, कोट्यवधींचा माल जप्त; १४ जणांना अटक, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Super El Nino : भयंकर संकट! जगावर घोंघावतोय 'सुपर अल निनो'; नासाच्या उपग्रहाने टिपले धक्कादायक फोटो, 1997 सारखा विनाश होणार?

Shocking News : लग्नाची लगबग, दारात मांडव सजला, पण एक दिवस आधीच वधूसह अख्ख्या कुटुंबाने जीवन संपवलं; धक्कादायक घटनेने सर्वजण हादरले

SCROLL FOR NEXT