Health news updates 
अकोला

पावसाळ्यातील आजार अंगावर काढू नका; डॉक्टरांचा सल्ला

दूषित पाण्यामुळे पावसाळाच्या काळात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

रिसोड : पावसाळा हा ऋतु प्रत्येकाला हवाहवासा वाटतो.पण पावसाळा आला की आजारपणही आलंच. मात्र सध्या सर्वजण कोरोना विषाणूशी झुंज देत असताना आता पावसाळा सुद्धा सुरू झाला आहे. या पावसात जमिनीवर साचणाऱ्या दुषित पाण्यामुळे आजार पसरतात. हे आजार अंगावर काढू नका वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या असे आवाहन डॉ. सागर बाजड यांनी केले आहे.

पावसाळाच्या काळात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार या पाण्यामुळे होणाऱ्‍या आजारांबरोबरच सर्दी, खोकला- पडसे यासारखे आजार जडतात. दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यांसारखेही विकार जडतात. याशिवाय पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने यांसारखे संसर्गजन्य आजारांची लागण होत असल्याचे रिसोड येथील बाजड क्लिनिकचे संचालक डॉक्टर बाजड यांनी सांगितले.पावसाळ्यात अनेकदा संसर्गजन्य आजारांसह त्वचारोग, फंगल इन्फेक्शन, मुरूम आणि सोरायसिस यांसारखे विकारही उद्भवू शकतात.

तसेच पावसात श्वसनविकाराची समस्या बळावते. पावसाळ्यात ताप, सर्दी व खोकल्याचे रूग्ण वाढतात. ही सर्व कोरोनाची लक्षणे आहेत. हे आजार टाळायचे असल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा एकमेव पर्याय आहे. यासाठी पौष्टिक आहाराच्या सेवनासह आरोग्याकडेही विशेष लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचा आहे.

उघड्यावरील पदार्थ खाणे टाळा

पावसाळ्यामध्ये बाहेरील उघड्यावरील पदार्थ, माशा बसलेले दूषित पदार्थ, शिळे अन्न, अर्धवट शिजलेले मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे कारण असे दुषित अन्न खाल्यामुळे पोटाचे विविध आझार, उलट्या, जुलाब, अतिसार, कॉलरा, हगवण, काविळ यांसारखे अनेक आजार होत असतात. त्यामुळे पावसाळ्यात बाहेरील उघड्यावरील दूषित अन्न खाणे टाळावेत असे आवाहन डॉक्टर सागर संजय बाजड यांनी केले आहे.

दूषित पाणी पिणे टाळावे

पावसाच्या पाण्यात जमिनीवरील कचरा, घाण, सांडपाणी मिसळून ते प्रदूषित पाणी नदीमध्ये जात असते. त्यामुळे असे दुषित पाणी पिण्यामुळे उलट्या, जुलाब, अतिसार, कॉलरा, हगवण, टायफॉइड आणि काविळ यांसारखे अनेक साथीचे आजार होत असतात. पावसाळ्यात गरम करून थंड केलेले स्वच्छ पाणी प्यावे. पाणी गरम करून वापरल्यामुळे पाण्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात.

रोग प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे

आपल्या आहारात रंगीबेरंगी पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढेल. ब्रोकोली, गाजर, हळद आणि आले यासारखे पदार्थ आपली त्वचा आणि केसांसह रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हळद ही औषधी वनस्पती असून यात अँटीऑक्सिडंट गुणधर्मांचा समावेश आहे. सर्दी व खोकल्यासाठी लसून अतिशय गुणकारी आहे. व्हिटॅमिन सी असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. श्वसनाची समस्या असणाऱ्यांसाठी आले खाणे अतिशय फायदेशीर आहे. पावसाळ्यात भरपूर पाणी प्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांनो लगेच बँक खाते तपासा, केंद्रानंतर राज्य सरकारकडून दोन हजार रुपये जमा

Nepal Protests : नेपाळ पेटले ! Zen-G आंदोलकांचा राष्ट्रपती निवासस्थानावर कब्जा, कायदा मंत्र्याचे घरही जाळले; राजकीय संकट गडद

Leopard Attack:'पारनेर तालुक्यात एकाच आठवड्यात बिबट्याच्या हाल्ल्यात दोघांचा मृत्यू'; तीन वर्षीय बालकावर हल्ला

Latest Marathi News Updates: डोंबिवलीतील पलावा परिसरात बिर्याणीच्या दुकानाला भीषण आग

Chandwad Accident : चांदवडच्या राहूड घाटात भारत गॅसचा टँकर पलटी; मोठी गॅस गळती सुरू

SCROLL FOR NEXT