Shri Gajanan Maharaj Shri Gajanan Maharaj
अकोला

शेगाव : १४ एप्रिलपासून विना पास श्रींचे दर्शन

नागरिकांसाठी दिलासादायक बाब आहे. परंतु, संत श्री गजानन महाराज संस्थानने ई - पास दर्शन बंद केलेले नाही.

सकाळ वृत्तसेवा

शेगाव : कोरोना नियंत्रणात आल्याने राज्य सरकारने (ता.१) निर्बंध मागे घेतले आहेत. मात्र, येथील संत गजानन महाराज संस्थानमध्ये १० एप्रिलपर्यंत ई - पासद्वारेच दर्शन सुविधा सुरु राहणार आहे . असे माहितीपत्रक संस्थानच्यावतीने प्रसारीत करण्यात आले आहे.कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असून, राज्यभरातील परिस्थिती सुधारत असल्याने राज्य सरकारने १ एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधक नियम हटविले आहेत. ही नागरिकांसाठी दिलासादायक बाब आहे. परंतु, संत श्री गजानन महाराज संस्थानने ई - पास दर्शन बंद केलेले नाही.

१० एप्रिलपर्यंत ई - दर्शन पासची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे १० एप्रिलपर्यंत ई - पासद्वारेच दर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यानंतर ११ ते १३ एप्रिलपर्यंत मंदिरातील अंतर्गत व्यवस्था पुर्ववत करण्यासाठी संत गजानन महाराज मंदिर दर्शनासाठी बंद राहील.१४ एप्रिलपासून खऱ्या अर्थाने ई - पास शिवाय दर्शन सुविधा सुरु होईल. तसेच २ ते १० एप्रिल या कालावधीत श्रीरामनवमी उत्‍सव येत असल्‍यामुळे श्री संस्‍थानच्‍या धार्मिक प्रथा-परंपरेनुसार उत्‍सव मर्यादीत स्‍वरुपात साजरा करण्यात येत आहे. भक्‍तनिवास व तेथील सोयी सुविधा मात्र, नेहमीप्रमाणे सुरु राहतील. उत्‍सवानिमित्‍त येणाऱ्या दिंड्यांमधील वारकऱ्यांची निवास व भोजनप्रसादाची व्‍यवस्‍था पुर्वीप्रमाणे विसावा संकुलात राहील, असे संस्थानच्यावतीने एका माहिती पत्रकाद्वारे सुचित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT