Shrirang Pinjarkar sakal
अकोला

Akola News : सेनेच्या माजी जिल्हाप्रमुखांचा शनिवारी शिंदे गटात प्रवेश

गेले काही दिवसांपासून शिवसेनेच्या ठाकरे गटात अकोला जिल्ह्यामध्ये फुट पडण्याची शक्यता वर्तवली जात होती.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी अकोला जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर हे आपल्या निवडक सहकाऱ्यांसोबत शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे. ठाणे येथे हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.

गेले काही दिवसांपासून शिवसेनेच्या ठाकरे गटात अकोला जिल्ह्यामध्ये फुट पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर हे शिंदे गटाच्या संपर्कात असून, ते लवकरच जाहीर प्रवेश करणार असण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

यापूर्वी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती. शिंदे गटाचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक रामेश्वर पवळ यांच्या समन्वयातून श्रीरंग पिंजरकर शिंदे गटात ठाणे येथे शनिवारी जाहीर प्रवेश करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. यावेळी शिंदे यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटातील काही माजी पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि काही सरपंच सुद्धा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती श्रीरंग पिंजरकर यांनी दिली.

कार्यकर्त्यांसाठी मुख्यमंत्री येणारा अकोल्यात

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पिंजरा हे शिंदे गटात प्रवेश करणार असून, त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्तेही शिंदे गटात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. मात्र, या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच अकोला येथे येणार असल्याची माहिती शिंदे गटाचे प्रदेश समन्वयक रामेश्वर पवळ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR Live: W,W,W,W,W! मोहसिन खानने कोलकाताचा निम्मा संघ तंबूत पाठवला; बुमराहच्या पंक्तीत स्थान, दोन मोठे विक्रम

धडा वेगळे शीर करून अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह; अघोरी पूजेतून नरबळी असल्याची शंका

IPL 2026 Controvarsy: फुल राडा... अंगकृश रघुवंशीच्या विकेटने वातावरण पेटले! अम्पायरने त्याला ढकलले, अभिषेक नायर भांडला Video

रॅडिसनची मोठी भरारी! २०३० पर्यंत भारतात ५०० हॉटेल्सचं लक्ष्य; ८० हजार तरुणांना मिळणार रोजगाराची सुवर्णसंधी

मुंबई उच्च न्यायालय भरतीत मोठा वाद! ‘राष्ट्रभाषा’ प्रश्नावरून संताप उसळला; मराठी एकीकरण समिती आक्रमक

SCROLL FOR NEXT