अकोला

पिवळ सोनं धमकलं!, सोयाबीनला हमीभावापेक्षा दुप्पट भाव

नऊ हजाराकडे वाटचाल

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कधी नव्हे ते सोयाबीनला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा दुप्पट भाव मिळत असून, दरदिवसाला होत असलेली दरवाढ लक्षात घेता नऊ हजाराकडे सोयाबीनची वाटचाल होताना दिसत आहे.


जिल्ह्यासह विदर्भामध्ये खरिपात सोयाबीन हे मुख्य पीक घेतले जाते. त्यामुळे सर्वाधिक पेरणी क्षेत्र सुद्धा सोयाबीनचेच असते. परंतु, कधी नैसर्गिक, अनैसर्गिक संकटामुळे उत्पादनात घट तर, कधी भावात घसरण, यामुळे सोयाबीन उत्पादकांना नेहमीच नुकसान सोसावे लागते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून दुष्काळ, कीड, अतिवृष्टी इत्यादी कारणांमुळे उत्पादनात घट व बाजारात सुद्धा हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. गेल्यावर्षी सुद्धा अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन निम्म्यावर आले.

मात्र, जिल्ह्यासह विदर्भात, महाराष्ट्रात व इतरही राज्यात सोयाबीन उत्पादनात घट आली. त्यामुळे आवक कमी व मागणी अधिक अशी स्थिती झाल्याने हंगामातील पीक विक्रीला आल्यापासूनच सोयाबीनला अधिक भाव मिळाला. आता तर हमीभावाच्या दुप्पट म्हणजे सात ते आठ हजारापर्यंत बाजार समितीमध्ये भाव मिळत आहे. अजून काही दिवस तेजी कायम राहाल्यास सोयाबीनचे भाव नऊ ते दहा हजारापर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

उत्पादन घटले, भाव वधारले
आपल्याकडे मुख्यत्वे महाराष्ट्र व मध्यप्रदेश ही दोन सोयाबीनची मोठे उत्पन्न घेणारे राज्य आहेत. हवामानाचा मोठा फटका इतर राज्यासह महाराष्ट्र, मध्यप्रदेशला सुद्धा बसला व देशांतर्गत सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे भाव उच्चांकीवर गेले आहेत. त्यामुळेही सोयाबीनचे भाव वाढून मिळत आहेत. सोयाबीन, कापूस, सूर्यफूल, करडी, शेंगदाणा या सर्व तेलबियांचे भाव सुद्धा गेल्या काही महिन्यापासून वधारलेले आहेत.

विकलं नसतं तर परवडलं असतं!
सोयाबीनला एवढा भाव मिळेल असं वाटलच नव्हतं, विकलं नसतं तर परवडलं असतं राव! बरेच शेतकरी एकमेकांशी बोलताना असे भाव व्यक्त करत आहेत.

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court : “निःपक्षपातीपणे अन् न्याय्य पद्धतीने काम करा, न्यायालयाचा भार वाढवू नका”; निवडणूक आयोगाला हायकोर्टाने फटकारलं

Pune Ganpati Visarjan Live Tracking: गणपती विसर्जन मिरवणूक Live; कोणतं मंडळ कुठे पोहोचलं? एका क्लिकवर पाहा लाईव्ह लोकेशन अन् ट्रॅफिक अपडेट्स

Raj Thackeray On Gyanesh Kumar : ‘ज्ञानेशाकडून सत्तेतले रेडे आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर पुन्हा निशाणा

Maharashtra Drought Subcommittee : बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना नऊ मंत्र्यांसह मुख्य सचिवांचा समावेश

Maharashtra Ganesh Visarjan Live: पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात Live पाहा, ढोलताशांच्या गजरात भक्तांचा उत्साह शिगेला

SCROLL FOR NEXT