PSI Rajendra More sakal
अकोला

Akola Crime : पीएसआय राजेंद्र मोरे यांचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू...

अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे पोलीस उपनिरिक्षकाला भरधाव कारने उडवले.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यातील बोरगाव मंजु पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलिस उप निरीक्षक राजेंद्र मोरे यांचा थोड्या वेळापूर्वी म्हणजेच पाच ते साडे पाच वाजताच्या दरम्यान कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

बोरगाव मंजू ते कुरणखेडच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर पीएसआय राजेंद्र मोरे यांचा हा अपघात झाला असून त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे. मोरे हे कुरणखेड येथून निघून आपले दुचाकी वाहन क्र.एमएच ३७ एबी ४९६५ ने बोरगाव मंजुकडे जात असताना ही दुर्दैवी घडली आहे.

ज्या चारचाकी वाहनाने हा अपघात झाला ती अकोला येथीलच असून ती नागपूरवरून अकोल्याला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटना स्थळाला भेट देवून संबंधितांना तपासाच्या दृष्टीने सूचना दिल्या आहेत.

राजेंद्र मोरे हे अकोला येथेच परिवारासह राहत असल्याचे त्यांचे सहकारी सांगत आहेत. मनमिळावू स्वभावाचे असलेले मोरे हे अकोला येथून बोरगावला दररोज आपल्या दुचाकीने जाणे येणे करीत असत. त्यांना दोन लहान लहान मुले असून मोरे यांच्या आकस्मिक मृत्यूने ती मुले व त्यांचा परिवार पोरका झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT