अकोला : एसटीच्या संपाने गावगाडा थबकला sakal
अकोला

अकोला : एसटीच्या संपाने गावगाडा थबकला

जनजीवन विस्कळीत, विद्यार्थ्यांची पायपीट

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर जैन : सर्वसामान्य गरिबांचा रथ असलेल्या एसटी महामंडळाच्या लालपरीची चाके गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जागची हलली नाहीत. त्याचा परिणाम ग्रामीण व शहरी भागावर होत असून, त्यामुळे गावगाडा थबकला आहे.

राज्यातील मोठ्या शहरांचे ग्रामीण भागात असलेल्या खेड्यापाड्याशी नाते जोडण्याचे काम नित्यनेमाने एसटीच करत असते. परंतु, कर्मचारी त्यांच्या मागण्यांवर ठाम असल्याने हा संप मिटण्याचे नाव घेत नाही. मात्र, या संपामुळे ग्रामीण भागातील जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले आहे. राज्य सरकारने याबाबत लवकरात लवकर योग्य तोडगा काढून तिची चाके कार्यरत करण्याची मागणी होत आहे.

वैश्विक महामारी कोरोनाच्या परिस्थितीमुळे दीड ते दोन वर्ष लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे आधीच ग्रामीण जनजीवन पूर्णपणे विस्कटले आहे. सध्या हे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यातच एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण जनजीवनाला फटका बसू लागला आहे. या संपाचा फटका खाजगी नोकरदारांना सुद्धा बसत आहे. ग्रामीण भागातून शहरात उपचारासाठी जाणाऱ्या वयोवृद्ध, गरीब लोकांचीही मोठी गैरसोय होत आहे. या लोकांना खासगी वाहनाशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे त्यांना अधिकचे पैसे मोजून तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी जावे लागत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल दीड दोन वर्षे शाळा, महाविद्यालये बंद होती, ती दिवाळीनंतर आता नुकतीच सुरू झाली आहेत. विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून शिक्षणासाठी तालुक्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी बस हा महत्त्वाचा पर्याय असतो. त्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे खाजगी वाहतूकदारांसाठी पर्वणीच ठरत आहे.

एसटी व शाळा वाचविणे गरजेचे

शालेय विद्यार्थ्यांना प्रवासासाठी एसटी महामंडळाकडून सवलतीच्या दरात पास दिल्या जातात. त्या गरीब विद्यार्थी शहरात शाळा-महाविद्यालयात शिक्षणाकरिता जाण्यासाठी त्यांना परवडण्या योग्य असतात. त्यांना दैनंदिन खाजगी वाहनांनी प्रवास करणे खिशाला परवडणारे नाही. पर्यायाने एसटी बंदमुळे मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होत असून, आर्थिक भूर्दंड बसत आहे. सध्या एसटी व जिल्हा परिषदेच्या शाळा या दोन्ही गोष्टी वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ओबीसींनी मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही, आम्ही जातीवादी...; मनोज जरांगे कडाडले, काय म्हणाले?

Shreyas Iyer: कर्णधारपदाची ऑफर श्रेयसनेच नाकारली? नवी अपडेट आली समोर

स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत होणार डॅशिंग हिरोची एंट्री; 'नशीबवान' मध्ये 'हा' अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

Everything To Know About Hernia: हर्निया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SBI Fellowship India: ग्रामीण विकासासाठी काम करायचंय? SBI Youth for India फेलोशिपसाठी आजच अर्ज करा!

SCROLL FOR NEXT