corona patients sakal
अकोला

अकोल्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या अडीच हजारांवर!

आणखी ३५२ रुग्णांची भर; ७२७ रुग्णांची कोरोना चाचणी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात रविवारी ७२७ कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झालेत. त्यातील ३५२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या अडीच हजारांवर पोहोचली आहे. अवघ्या २३ दिवसांत रुग्णांची संख्या पाच वरून २५०४ वर पोहोचल्याने रुग्ण संख्या वाढीच्या गतीने धडकी भरविली आहे.अकोला शहर व जिल्ह्यातील रविवार, ता. २३ जानेवारी रोजी दिवसभरात आरटीपीसीआरचे ७२७ चाचणी अहवाल प्राप्त झालेत. त्यात ३२६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय रॅपिड ॲन्टीजेन चाचणीत २६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३५२ नोंदविल्या गेली.

रुग्ण बरे होण्याची संख्याही वाढली

एकीकडे जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्या तुलनेत कोरोनावर मात करीत बरे झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. रविवारी दिवसभरात होम आयसोलेशन येथून ३२० जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

२५०४ रुग्णांवर उपचार

अकोला जिल्ह्यात रविवारी ३५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २५०४ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६२ हजार ३३१ पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एक हजार १४८ जणांचा मृत्यू झाला. कोरोनावर ५८ हजार ६७९ जणांनी यशस्वी मात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT