Traffic in Buldana district was disrupted for six hours due to unseasonal rains
Traffic in Buldana district was disrupted for six hours due to unseasonal rains 
अकोला

जिल्ह्यात अवकाळीचा तांडव; वीज पडल्याने महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

डोणगाव (बुलडाणा) : जिल्ह्यातील घाटावरील सहा तालुक्यातील अवकाळी पाऊस, वादळवार्‍यासह गारपिटीचा तांडव पहावयास मिळाला. याचा सर्वाधिक फटका मेहकर तालुक्याला बसला असून, प्रशासनाने तेथे तत्काळ पंचनाम्याचे काम सुरू केले आहे. औरंगाबाद ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गानजीक असलेले झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक सहा तास ठप्प झाली होती.
 
डोणगाव परिसरात शुक्रवारी (ता.१९) संध्याकाळी अवकाळी पाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला. गारपीटीसह शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. विद्युत प्रवाह संध्याकाळी आठ वाजल्यापासून खंडित आहे. मुंबई ते नागपूर राज्य महामार्गावरील बाभळीचे झाड पडल्यामुळे वाहतूक सहा तास ठप्प झाल्याने प्रवाशांची चांगली तारांबळ उडाली. झाड हे राज्य महामार्गावर पडल्यामुळे पोलिस प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते सलीम शहा लकडी ठेकेदार यांनी मदत केली. सलीम शहा यांचे काही सहकारी राज्य महामार्ग वरील पडलेली झाडे बाजूला करताना त्यांनाही थोड्याफार प्रमाणात दुखापत झालेली आहे. बाभळीचे झाडे एका मोठ्या ट्रकवर पडल्यामुळे गाडीचे नुकसान झाले आहे.
 
शेकडो एकरातील कांदा, हळद, गहू जमीनदोस्त झाला आहे. परिसरात उन्हाळी पिकाचे सत्र सुरू असून, हातातोंडाशी आलेला गहू, कांदा व हळद पावसाने मातीमोल करून टाकले आहे. रामकृष्ण पळसकर यांच्या शेतातील गोठ्यात हरभरा, सोयाबीन व तूर साठवली होती. मात्र, अवकाळी पावसासह वार्‍यामुळे गोठ्यावरुन टीनपत्रे उडून धान्य पाण्यात भिजले. अमोल पळसकर यांच्या शेतातील काढणीसाठी पकडलेली हळद पसर असल्याने हळदीमध्ये पाणी साचल्याने हळद कुजण्याची ही दाट शक्यता वर्तवली जात आहे. राज्य महामार्गावर अंजनी, डोणगाव परिसरात मोठमोठे बाभळीचे झाडे पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासन व गावकर्‍यांनी सहकार्य केले. 

मेहकरमध्ये विजेने घेतला महिलेचा बळी 

गेल्या २४ तासांपासून जिल्ह्यात वादळीवार्‍यासह गारपिटीने धुमाकूळ घातला असून, अनेकांच्या जिवाचा थरकाप उडत आहे. दरम्यान, शुक्रवार व शनिवारी संध्याकाळी व रात्री विजेचे तांडव व रुद्रावतार काय राहतो याचा थरारक अनुभव घेतला. एकीकडे हा थरार रंगत असतानाच मेहकर तालुक्यात हीच वीज एका महिलेसाठी अक्षरशः काळ ठरली. संध्याकाळी ते रात्री ८.३० वाजेदरम्यान कमीअधिक हजेरी लावणार्‍या पावसादरम्यान विजेचे हे तांडव सुरू राहिला. मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रूक येथील कासाबाई उत्तम नागोलकर या ५५ वर्षीय महिलेचा बळी घेतला. अंजनी शिवार परिसरातील गट क्रमांक २५८ मधील शेतातील गोठ्यात त्या राहात होत्या. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास नेमके त्या गोठ्यावर विजेचा प्रलयकारी लोळ कोसळला अन् कासाबाई गतप्राण झाल्या. अंजनी बुद्रुकचे तलाठी यांनी याचा अहवाल मेहकर तहसीलदार यांना सादर केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: तामिळनाडूमध्ये बसचा अपघात; १५ जखमी

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT