Corona Vaccine Google file photo
अकोला

लसीकरणाची गती वाढणार, १३ हजार डोस मिळाले

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्ह्याला १३ हजार लसींचे डोस मिळाले आहेत. त्यामध्ये कोव्हॅक्सिनच्या ६ हजार १०० तर कोव्हिशिल्डच्या ६ हजार ९०० लसींचा समावेश आहे. सदर लसींचा साठा अल्प असला तरी त्यामुळे लसीकरणाची गती वाढेल. (Vaccination speed will increase, 13,000 doses received)



कोरोना ससंर्गाला आळा घालण्यासाठी लसीकरणाशिवाय तूर्तास दुसरा कोणताच उपाय सध्या उपलब्ध नसल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान आता १८ वर्ष वयोगटातील लाभार्थांना सुद्धा लस देण्यात येत आहे. परंतु लसींचा अल्प साठा मिळत असल्याने जिल्ह्यातील लसीकरण मोहीमेची गती मंदावत आहे. दरम्यान आता जिल्ह्यासाठी १३ हजार लसींचे डोस मिळाल्याने लसीकरणाची गती वाढेल.

Vaccination speed will increase, 13,000 doses received

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिला सामना १३ ऐवजी १४ सप्टेंबरला? पोलिसांच्या पत्रानंतर काय निर्णय झाला? महत्त्वाच्या अपडेट्स

Marathi News Live Updates : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला

केंद्राचा आदेश पण कर्नाटक भूमिकेवर ठाम! काँग्रेसच्या १९३७ सालच्या ठरावाचं होणार पालन, DK सरकारचा आदेश नेमका काय?

Bail Pola Festival : जात-पात विसरून एकाच माळेत; अमळनेर वस्तीत हिंदू-मुस्लिम बांधवांचा बैलपोळा उत्साहात

MPSC paper leak confession : व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट आहे, हे आम्हीही मान्य करतो ; आमदार विक्रम पाचपुते यांची स्पष्टोक्ती

SCROLL FOR NEXT