Voter List Sakal
अकोला

अकोला : प्रभागानुसार मतदार यादी विभाजन सुरू

२८ फेब्रुवारीपर्यंत मुदत; निवडणूक आयोगाचा आदेश

सकाळ वृत्तसेवा

अकोला : एकीकडे प्रभाग रचनेबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून, दुसरीकडे जाहीर झालेल्या प्रभागानुसार मतदार यादीचे विभाजन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादी विभाजनासाठी २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे.

अकोला महानगरपालिकेच्या ९१ सदस्य असलेल्या ३० प्रभागांची रचना ता. १ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ता. १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून, ता. २६ फेब्रुवारीला आयोगातर्फे सुनावणी घेण्यात येणार आहे. एकीकडे ही प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडे आयोगाच्या ता. ३ फेब्रुवारीच्या पत्रानुसार जाहीर प्रभागांच्या रचनेनुसार मतदार यादीच्या विभाजनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मतदार यादी विभागाजनासाठी मनपा प्रशासनाला २८ फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे.

सीमांच्या बदलानुसार विभाजन

निवडणूक आयोगाने मनपा आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार निवडणूक प्रभागांच्या भौगौलिक सीमा अंतिमरित्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्या अनुषंगाने होणारे बदल विचारात घेवून मतदार यादीचे विभाजन करण्यात येणार आहे. हरकती व आक्षेप नोंदविल्यानंतर त्यानुसार प्रभागांच्या सीमांमध्ये काही बदल झाल्यास अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर त्यानुसार मतदार यादीच्या विभाजनातही बदल केले जाणार आहे.

विधानसभेच्या यादीवरून विभाजन

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता भारत निवडणूक आयोगाने ता. १ जानेवारी २०२२ रोजी अर्हता दिनांकावर ता. ५ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभेची मतदार यादीच प्रभागाच्या सीमा लक्षात घेवून विभाजन करण्यात येणार आहे. ही मतदार यादी मूळ व पुरवणी स्वरुपात जिल्हाधिकारी यांच्याकडून मनपा प्राप्त होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: 11 हजारांनी घसरल्यानंतर सोन्याने घेतला U-Turn! ग्राहकांना मोठा झटका? जाणून घ्या आजचा ताजा भाव

Anna Hazare Praises Tukaram Mundhe : "अशा डॅशिंग अधिकाऱ्यांची देशाला गरज"; तुकाराम मुंढेंच्या 'त्या' धडक मोहिमेवर अण्णा हजारे खूश, केलं तोंडभरुन कौतुक

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्याकांत प्रकरणात सियाच्या दोन मैत्रीणींकडेही चौकशी होणार

सरकारी रुग्णालयात प्रसुती झाल्यास मिळणार सोन्याची अंगठी, राज्य सरकारचा मोठा निर्णय...

TrashBot : बारावीच्या विद्यार्थिनीने बनवला अद्भुत 'ट्रॅशबॉट' रोबो; कचरा बघताच पळत जाऊन करतोय साफसफाई, पाहून तुमचं डोकं चक्रावेल

SCROLL FOR NEXT