Railway sakal
अकोला

Washim News : रेल्वेनुसार चालतो अकोला जिल्ह्यातील सरकारी कार्यालयातील कारभार

अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन पंचवीस वर्षाचा कालावधी उलटला. तरी जिल्ह्यातील सरकारी कार्यालयातील कारभार अकोल्यावरून येणाऱ्या रेल्वेगाडीच्या वेळापत्रकावर हाकला जात आहे.

राम चौधरी

वाशीम - अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन पंचवीस वर्षाचा कालावधी उलटला असला तरी जिल्ह्यातील सरकारी कार्यालयातील कारभार अकोल्यावरून येणाऱ्या रेल्वेगाडीच्या वेळापत्रकावर हाकला जात आहे. अकोला ते वाशीम ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणाचाच अंकूश नसल्याने कधीही या आणि कधीही जा, अशी परिस्थिती आहे. आकांक्षीत जिल्ह्यात असा खेळखंडोबा होत असल्याने जनतेची कामे प्रभावित होत आहेत.

प्रारंभी अनेक सरकारी कार्यालये अकोला येथेच होती. मात्र नंतर काही अपवाद वगळता सर्वच कार्यालये जिल्ह्यात आली, मात्र आता अकोला येथील मुळ रहिवासी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक वाशीम येथे आहे. हे कर्मचारी मुख्यालयी राहणे अपेक्षित असतांना ते दररोज अकोला येथून अप-डाऊन करतात.

अकोला येथून वाशीमसाठी सकाळी साडेनऊ वाजता इंटरसिटी रेल्वेगाडी सुटते. ती वाशीम येथे साडेदहा वाजता पोचणे अपेक्षित असतांना बहुतेक वेळा या गाडीला विलंब होतो. याच गाडीत जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे विभाग, जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, समाजकल्याण विभाग व इतरही सरकारी कार्यालयातील साठ ते सत्तर अधिकारी व कर्मचारी असतात. ते बारा वाजता कार्यालयात पोचतात.

हे कर्मचारी व अधिकारी कार्यालयात विसावत नाहीत तोच लंच टाईम होतो. त्यानंतर दुपारी अडीचनंतर काम सुरू होत नाही तोच इंटरसिटीच्या वेळापत्रकानुसार कार्यालयातील घड्याळावर नजर ठेवत कर्तव्य बजावतात. इंटरसिटी पुर्णावरून सायंकाळी साडेचार वाजताच वाशीम रेल्वे स्थानकात येत असल्याने कर्मचारी चक्क चार वाजताच कार्यालय सोडून रेल्वेस्थानकाकडे धाव घेतात. या धावाधावीत जिल्ह्यातील सरकारी कार्यालयातील कामाचे पार तीनतेरा वाजत आहेत.

हे कर्मचारी केवळ तीन ते चार तास कर्तव्य बजावत असल्याने अनेक कामे खोळेबून हेच कर्मचारी जिल्हा कायम आकांक्षीत राहण्यासाठी हातभार लावत आहेत. मुख्य म्हणजे काही कार्यालयातील विभाग प्रमुखासह इतरही कर्मचारी अकोला-वाशीम वारीचे वारकरी असल्याने अनेक कार्यालये दुपारी चार वाजताच ओस पडतात.

जिल्हा परिषद अपडेट आता जिल्हाधिकाऱ्यांकडून पुढाकार आवश्यक

जिल्हा परिषदेत वैभव वाघमारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर या लेटलतिफशाहीला वठणीवर आणले. साडेनऊ वाजताच जिल्हा परिषद सजग होत असल्याचे दिसून येत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी इतरही सरकारी कार्यालयांची झाडाझडती घेण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT