Washim deprived settlement Meet the messenger of thirst sakal
अकोला

वाशीम : वंचितांच्या वस्तीला भेटला तहानेचा दूत

युवकाच्या प्रयत्नाला प्रशासनाची साथ : कोयाळीचा पाणी प्रश्न निमला

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : रिसोड तालुक्यातील कोयाळी भिसडे येथील बौद्ध समाजाच्या वस्तीला गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी वणवण पायपीट करावी लागत होती. मात्र येथील युवक गजानन वानखेडे या युवकाच्या प्रयत्नाला प्रशासनाने संवेदनशिलता जपत दिलेली साथ या वंचितांच्या वस्तीची तहान भागवून गेली आहे.

वाशीम रिसोड महामार्गावर कोयाळी भिसडे गाव आहे. या गावाच्या वर धरण सुध्दा आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या गावातील दलित वस्तीतील पाण्याची वानवा कायमच होती. पावसाळ्यात नदी ओलांडून पाणी आणावे लागत होते. तर उन्हाळ्यात नदीकाठच्या विहीरीवरील दुषित पाण्यासाठी होरपळ होत होती. अनेक वेळा अर्जविनंत्या करूनही तहान कायम असताना लॉकडाऊनमधे गावात आलेल्या गजानन वानखेडे या युवकाने हा प्रश्न मनावर घेतला.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वसूमना पंत यांनीही प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेत संवेदनशीलतेचा परिचय देत, या गावातील पाण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण मापारी, अभियंता कुणाल तायडे, माहीती आणी संवाद तज्ञ राम श्रृंगारे, पाणीपुरवठा व स्वच्छता कक्षाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी रवि सोनुने सरपंच अशोक भिसडे, यांच्या धडपडीतून एका दिवसात या वस्तीत कुपनलीका घेतली. या कुपनलिकेला भरपूर पाणी उपलब्ध झाले आहे. एका सुशिक्षित युवकाच्या प्रयत्नाला प्रशासनाने साथ दिल्याने या वस्तीचा पाणीप्रश्न कायमचा निकाली निघाला.

''कोयाळी येथील दलित वस्तीत पाण्याची समस्या कायम होती. पावसाळ्यात सुध्दा नदी ओलांडून पाणी आणावे लागत होते. उन्हाळ्यात तर पायपीट करावी लागत होती. या संदर्भात मी व गावातील युवक वैभव वानखेडे व रितेश वानखेडे यांच्यासोबत जिल्हा परिषदेत निवेदन दिले. जिल्हा परिषदेतील अधिकारी वर्गाने अतिशय संवेदनशीलतेने हा प्रश्न निकाली काढला आहे.''

- गजानन वानखेडे, कोयाळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT