A woman along with two youths have been arrested in Akola for posting obscene photos on a girls mobile phone 
अकोला

अल्पवयीन मुलीला मोबाईलवर पाठवले अश्लील फोटो; दोन युवकांसह एका महिलेला अटक

सकाळ वृत्तसेवा

अकोला : मोबाईलवर अश्लील फोटो पाठवून आणि पाठलाग करून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात घडली होती. या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी अकोला जिल्ह्यातील टाकळी पोटे येथून दोघांना तर एका महिलेला मध्यप्रदेशातून अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये टाकळी पोटे येथील विजय मोहन डाबेराव (२१), रंजित रणसिंग पवार (१९) आणि १९ वर्षीय महिला रा. नवेगाव, जि. बालाघाट (म. प्र.) असे तीन आरोपी आहेत. फिर्यादी मुलगी (वय १५ वर्ष) हिला ओळखीचे दोन इसम व एक महिला यांनी वारंवार फोन करून तिला फोनवर बोलण्यास सांगत होते. परंतु फिर्यादीने नकार दिला. सदर आरोपींनी फिर्यादीच्या एका मैत्रिणीला फोन करून फिर्यादीला बोलण्यास सांगितले. नाही बोलली तर जिवाने मारून टाकेल अशी धमकी दिली. फिर्यादीच्या मोबाईल व्हॉट्स ॲपवर एका आरोपी महिलेने तिचे अश्लील फोटो पाठवून लज्जास्पद वाटेल असे कृत्य केले.

याशिवाय आरोपींनी फिर्यादीच्या गावात जाऊन सतत पाठलाग केला व तिला फोन केले. अशा आशयाच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी तीन आरोपींविरूध्द पोक्सोसह इतर गुन्हे दाखल केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चांदूर रेल्वेचे ठाणेदार मगन मेहते यांनी एका पथकाला आरोपींच्या शोधात रवाना केले. या पथकाने प्रथम अकोला जिल्ह्यातील टाकळी पोटे येथून आरोपी विजय मोहन डाबेराव (२१) व रंजित रणसिंग पवार (१९) यांना अटक केली. त्यानंतर मध्यप्रदेश मधील नवेगाव, जि. बालाघाट येथून १९ वर्षीय महिला आरोपीला शिताफीने अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Rain Forecast : विदर्भात पावसाचा जोर वाढणार ; चक्रीवादळाचा प्रभाव, २४ सप्टेंबरनंतर मुसळधारेची शक्यता

FDA Action: 'सुलेमान मिठाईवाला'वर बडगा! मुंबईतील १० आस्थापनांचे परवाने एफडीएकडून निलंबित

Asian Games 2026 : भारतीय नौकानयनपटू 'संपावर' जाण्याच्या तयारीत! जपानमध्ये खेळाडूंकडून बंडाची भूमिका; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : गंगाखेड तालुक्यात गांजाची लागवड, ७६.९६ लाखांचा माल जप्त

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

SCROLL FOR NEXT