Crime News Sakal
अकोला

Yavatmal : विहिरीत ढकलून देत पतीने केला पत्नीचा खून

विहिर परिसरात कुणीच नसल्याची संधी साधून तिला विहिरीत ढकलून दिले

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : संशयाचे भूत मानगुटीवर बसलेल्या एका व्यक्तीने पत्नीला पिण्याचे पाणी आणण्याच्या बहाण्याने नेत विहिरीत ढकलून ठार केले. समाजमन सुन्न करणारी निर्घृण खुनाची ही गंभीर घटना गुरुवारी (ता.दोन) रात्री आठ वाजताच्या सुमारास कळंब तालुक्यातील शरद (येरद) शिवारात घडली.

पूजा राहूल मेश्राम (वय२५) असे विहिरीत ढकलून देत ठार करण्यात आलेल्या विवाहितेचे तर राहुल उद्धव मेश्राम (३२) असे तिला ठार करणार्‍या आरोपी पतीचे नाव आहे. पुजाचे गावातीलच एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी राहुल याला होता. त्यातूनच तो अनेकदा तिच्याशी भांडण करायचा.

तिला मारहाणही करायचा. त्यातच त्याने पुजाचा कायमचा काटा काढण्याचे मनोमन ठरविले होते. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी त्यांच्यात याच कारणावरून वाद झाला. त्यानंतर काही वेळाने त्याने पुजाला पाणी आणण्याच्या बहाण्याने गावातील विहिरीवर नेले.

विहिर परिसरात कुणीच नसल्याची संधी साधून तिला विहिरीत ढकलून दिले. पाण्यात श्‍वास गुदमरुन तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तो मी नव्हेचची भूमिका घेत आरोपी राहुल घरी परतला. पूजा बेपत्ता असल्याचा गवगवा करीत या घटनेला त्याने आत्महत्या दर्शविण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी (ता.तीन) सायंकाळी पुजाचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आला.

त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच तिचे नातेवाईक तेथे दाखल झाले. वडील जगदीश गजभिये यांनी या प्रकरणी कळंब पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून आरोपी पती राहूल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

हिंदूंची जमीन मुस्लिमांच्या नावे केल्याचे आरोप, महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापे; ९० लाखांची रोकड अन् कोट्यवधींचं सोनं जप्त

Latest Marathi News Updates : ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल!

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

SCROLL FOR NEXT