Pkv safai akola.jpg 
अकोला

जो घाबरला तो योद्धा कसला...वाचा कोरोना योद्ध्यांची गोष्ट

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने योगदान देत आहे. त्याअंतर्गत कोणी अन्नदान करत आहे तर कोणी वैद्यकीय सेवा देत आहे. याव्यतिरीक्त कोणी लोकांना ये-जा करण्यासाठी मदत करत आहेत. मात्र अकोल्यातील काही युवकांनी स्वच्छतेच्या सेवेचा विडा उचलत कोविड केअर सेंटरला स्वच्छ ठेवण्याचे काम सुरू केले आहे. 

संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात सुद्धा कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात येत आहे. त्यासोबतच कोरोनाचे सौम्य लक्षण असलेले रुग्ण व संशयित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात काम करणारे सर्वच लोक कोरोना संसर्गाच्या सावटाखाली आहेत.

अशा ठिकाणी परिसर स्वच्छता व अन्य लहान, मोठी अस्वच्छ कामे करण्यासाठी कोणीच तयार होत नसल्याचे वास्तव आहे. परंतु अकोल्याती सुपूत्रांनी एकत्र येवून कोविड केअर सेंटरची साफ-सफाई करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याबदल्यात प्रशासन युवकांना त्यांच्या सेवावृत्तीबद्दल मोबदला सुद्धा देत आहे. त्यासोबत युवकांनी स्वतःहून पुढे येत काम करण्यास सुरुवात केल्याने त्यांचे कौतूक सुद्धा करत आहे. प्रशासनाने युवकांच्या राहण्याची व्यवस्था सुद्धा कोविड केअर सेंटर जवळच केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनीही या युवकांना प्रोत्साहन दिले आहे. 

युवकांची मोलाची कामगिरी
कोविड केअर सेंटर परिसर करण लोहोरे, सूर्यभान कोरी, कशिन शर्मा, गौरव खरे, मनीष पथरोडीया, सागर घरमुडे, शेषराव तायडे, सुरज तायडे, आनंद चिंतामण, जितू गागापांग, सोनू खरारे स्वच्छता योद्धे म्हणून भूमिका पार पाडत आहेत. संंबंधित युवकांना स्वच्छतेसाठी पुरेसे सुरक्षा साहित्य (ग्लोव्हज, मास्क, फेस शिल्ड,सॅनिटायझर इ.) पुरविण्यात येते. संबंधित युवक या भागात रुग्णांच्या दैनंदिन वस्तू वापरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची स्वच्छता करुन हा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात मोलाची कामगिरी बजावत आहेत. त्यामुळे येथील वातावरणही प्रसन्न भासू लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Beed Baby News: मृत घोषित केलेलं बाळ रात्रभर दुर्लक्षित; दुसऱ्या दिवशी बॅगमध्ये टाकून नेलं, कुदळ सापडेना म्हणून झाला उशीर अन्...

तेजश्री प्रधानच्या झी मराठीवर दिसण्यावर स्टार प्रवाहच्या सतीश राजवाडेंची थेट प्रतिक्रिया; म्हणाले, 'ती नायिका आधी...

IND vs ENG 3rd Test: जो रूटचे विक्रमी शतक! भारतासमोर मजबूत भिंतीसारखा राहिलाय उभा; राहुल द्रविड, स्टीव्ह स्मिथचा विक्रम मोडला

SCROLL FOR NEXT