अकोला

जिल्हा परिषद-पंचायत समितीची पोटनिवडणूक, उमेदवारीची प्रक्रिया आजपासून

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्हा परिषदेसह पंचायत समितींच्या ४२ जागा मार्च महिन्यात रिक्त झाल्या होत्या. सदर जागा सर्वसाधारण अर्थात खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १९ जुलै रोजी मतदान तर २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे, तर इच्छुक उमेदवार १९ जूनपासून ५ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करु शकतील. (Zilla Parishad-Panchayat Samiti by-election, candidature process from today)

जिल्हा परिषदेच्या राजकीय आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या वर जात सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा २७ टक्के नुसारच निश्चित करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मार्च २०२१ मध्ये अकोला जिल्हा परिषदेतील ओबीसी प्रवर्गासाठीच्या १४ तर अकोला, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा पंचायत समितींच्या २८ जागांवर गडांतर आले होते. परंतु त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने पोट निवडणूक घेणे टाळले. दरम्यान आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने पोटनिडवणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आता निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे.



उमेदवारी दाखल करण्यासाठी पाचच दिवस
आयोगाच्या आदेशाप्रमाणे जिल्हाधिकारी २९ जून रोजी निवडणुकीच्या तारखांची सूचना व कार्यक्रम प्रसिद्ध करतील. त्यानंतर उमेदवार २९ जून पासून ५ जुलैपर्यंत उमेदवारी दाखल करूशकतील. ३ व ४ जुलै रोजी शासकीय सुटी असल्याने या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. ६ जुलैरोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येईल व त्यानंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. या प्रक्रियेसंदर्भात न्यायालयात १२ जुलैपर्यंत न्यायालयात दाद मागता येईल व न्यायप्रविष्ट प्रकरण नसलेल्या ठिकाणी १२ जुलै तर न्याय प्रविष्ट प्रकरण असलेल्या ठिकाणी १४ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. उमेदवारांना निवडणूच चिन्हांचे वाटप १२ जुलै व १४ जुलै रोजी करण्यात येईल. त्यानंतर प्रचाराला सुरूवात होईल व १९ जुलै रोजी मतदान व २० जुलै रोजी मतमोजणी करण्यात येईल.

Zilla Parishad-Panchayat Samiti by-election, candidature process from today

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविक भारावले, पाहा खास फोटो

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

SCROLL FOR NEXT