election sakal
अकोला

अकोला : शिक्षकांनी फोडले प्रचाराचे नारळ; पॅनलमध्ये सामना!

अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत उमेदवारांची अंतिम यादी चिन्हांसह प्रकाशित करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत उमेदवारांची अंतिम यादी चिन्हांसह प्रकाशित करण्यात आली.

अकोला - जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत (Election) उमेदवारांची अंतिम यादी (Final List) चिन्हांसह प्रकाशित करण्यात आली. संचालक पदाच्या एकूण १३ जागांसाठी ६० उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत शिक्षकांचे प्रगती, सहकारी, नवक्रांती हे तीन पॅनल, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) आणि अन्य उमेदवार यांच्यामध्ये सामना होणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या पॅनलने प्रचाराचे नारळ फोडले असून प्रचार सुद्धा सुरु केला आहे.

स्थानिक न्यू राधाकिशन प्लॉटमध्ये जि. प. प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेकडे नामांकीत वित्त संस्था म्हणून पाहिले जाते. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनी या संस्थेची स्थापना केली आहे. सध्या या संस्थेच्या संचालक मंडळासाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर २३८ शिक्षक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. संबंधित अर्जांची छाननी केल्यानंतर ११ शिक्षक उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. संबंधित ११ शिक्षकांपैकी सात शिक्षकांनी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व्ही.डी. कहाळेकर यांच्याकडे याचिका दाखल केली होती. सदर याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर संबंधित शिक्षकांचे अर्ज हे वैध असल्याचा निर्वाळा डीडीआर यांनी दिला होता. दरम्यान निवडणूक कार्यक्रमानुसार पतसंस्थेच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी विविध मतदारसंघातून ११३ शिक्षकांनी माघार घेतली. तर ६० शिक्षकांनी निवडणुकीत त्यांची दावेदारी कायम ठेवल्यामुळे त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटप सुद्धा करण्यात आले आहे.

शिक्षकांचे असे आहेत पॅनल

साने गुरुजी प्राथमिक शिक्षक सेवा संघ (दोन्ही), कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना एकत्र आले असून, त्यांनी सहकार पॅनल गठित केले आहे. पॅनलमधील उमेदवारांची निशाणी फॅन आहे.

- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शिक्षक संघटना, बहुजन शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (धांडे गट), शिक्षक प्रतिनिधी सभा, शिक्षक आघाडी, आदिवासी विकास शिक्षक परिषद, दिव्यांग शिक्षक संघटनेचे प्रगती पॅनल आहे. या पॅनलमधील उमेदवारांची निशाणी पतंग आहे.

- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) स्वळावर निवडणूक रिंगणात उतरली असून, निशाणी बॅट आहे.

- ॲक्शन फोर्स शिक्षक संघटनेने नवक्रांती पॅनल तयार केले असून निशाणी कपबशी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींचा १ तासाचा कार्यक्रम, रस्ता ७ दिवसांसाठी बंद का? उच्च न्यायालयात याचिका दाखल

Hapus Mango Prices : रत्नागिरी हापूस थेट 1000 रुपये डझन; सोलापूर मार्केट यार्डात आंब्यांचे भाव गगनाला भिडले, कर्नाटकी हापूसचा दर काय?

Latest Marathi News Live Update : शिवसेनेतील फुटीमागे चुकीच्या माहितीचे राजकारण; आमदार माऊली कटके यांचा दावा

Sangli Gool Bazaar: तुकाराम मुंढेंच्या कारवाईची धास्ती! सांगलीचा गूळ बाजार १२ दिवसांपासून ठप्प, कोट्यवधींची उलाढाल बंद, कर्नाटकातून आवकही थांबली

IND vs AFG 2nd ODI: नितीश कुमार रेड्डीची निवड का केली नाही? BCCI चे चिंता वाढवणारे अपडेट्स; नवा ओपनर दुसऱ्या षटकात OUT

SCROLL FOR NEXT