1 रुपयाच्या 'या' शेअरची कमाल! दोन वर्षात लाखाचे झाले 50 लाख
1 रुपयाच्या 'या' शेअरची कमाल! दोन वर्षात लाखाचे झाले 50 लाख Sakal
अर्थविश्व

1 रुपयाच्या 'या' शेअरची कमाल! दोन वर्षात लाखाचे झाले 50 लाख

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाच्या काळात अनेक पेनी स्टॉक्‍स आहेत, जे मल्टिबॅगर्स झाले आहेत. या शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला.

कोरोनाच्या (Covid-19) काळात अनेक पेनी स्टॉक्‍स (Penny Stocks) आहेत, जे मल्टिबॅगर्स (Multibaggers) झाले आहेत. या शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला, त्यामुळे गुंतवणूकदारांचा पैसा अनेक पटींनी वाढला आहे. असाच एक पेनी स्टॉक म्हणजे लॉयड्‌स स्टील्स इंडस्ट्रीज (Lloyds Steels Industries). 10 जानेवारी 2020 रोजी लॉयड्‌स स्टील्सचा स्टॉक NSE वर 0.50 च्या किमतीवर होता. त्याच वेळी, दोन वर्षांनंतर 7 जानेवारी 2022 रोजी त्याची किंमत 24.95 रुपये होती. या दोन वर्षात या शेअर्सने (Shares) सुमारे 4900 टक्के वाढ नोंदवली आहे. (A big return to the investors given by this share of one rupee)

स्टॉकचा प्रवास

गेल्या एका वर्षात हा मल्टिबॅगर पेनी स्टॉक 1.00 रुपयांवरून रु. 24.95 प्रति स्टॉकपर्यंत वाढला आहे. या कालावधीत सुमारे 2400 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या 6 महिन्यांत लॉयड्‌स स्टील्स इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 3.45 रुपयांवरून 24.95 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत सुमारे 625 टक्के वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात, पेनी स्टॉकने रु.10.80 वरून रु. 24.95 ची पातळी गाठली आहे. एका आठवड्यात हा मल्टिबॅगर पेनी स्टॉक 20.65 रुपयांवरून 24.95 रुपयांपर्यंत वाढला आहे, ज्यामुळे त्याच्या शेअर्सधारकांना सुमारे 21 टक्के परतावा मिळाला आहे.

गुंतवणुकीत झाली इतकी वाढ

जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका आठवड्यापूर्वी म्हणजे 3 जानेवारी 2022 रोजी लॉयड्‌स स्टील्स इंडस्ट्रीजच्या स्टॉकमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असेल तर त्याची रक्कम 1.21 लाख रुपये झाली आहे. जर गुंतवणूकदाराने महिन्यापूर्वी 1 लाख गुंतवले असते तर त्याची रक्कम 2.30 लाख रुपये झाली असती. गेल्या 6 महिन्यांत 1 लाखाची रक्कम 7.25 लाखांवर गेली आहे, तर वर्षभरापूर्वी ती 25 लाख रुपये झाली आहे. दोन वर्षांत ही रक्कम वाढून 50 लाख झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT