अर्थविश्व

तुम्ही पॅन आधारला लिंक केले का? नाहीतर... 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: येत्या 31 मार्च 2019 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करणे गरजेचे आहे. कारण आधारला पॅन लिंक न केल्यास आयटी कलम 139 एएअंतर्गत ते निष्क्रिय समजले जाणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने (सीबीडीटी) पॅन कार्ड आधारला लिंक करण्याची मर्यादा वाढवून 31 मार्च 2019पर्यंत वाढविली आहे. याआधी 30 जून 2018 पर्यंत ते लिंक करणे अपेक्षित होते.  सर्वोच्च न्यायालयाने देखील पॅन कार्ड आधारशी जोडणे अनिवार्य असल्याचा आदेश दिला आहे.

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाहीतर पॅन कार्ड निष्क्रिय समजले जाईल. शिवाय ऑनलाइन ITR फाइल (आयटीआर) करता येणार नाही. परिणामी प्राप्तिकर विभागाकडून देखील आयटीआर वेळेत भरणा न केल्याने नोटीस पाठविली जाऊ शकते. 

कसे कराल आधार-पॅन लिंक? 
पहिल्यांदा गुगल क्रोम ब्राऊझरवरून प्राप्तिकर विभागाची ई-फायलिंग www.incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या लाल रंगाच्या लिंक आधार या टॅबवर क्लिक करा. जर आपले खाते नसेल तर आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर निळ्या अक्षरात दिलेल्या टॅबवर क्लिक करून प्रोफाइल सेटिंग निवडा. तिथे दिलेल्या सेक्शनमध्ये आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरा. सर्व माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या लिंक आधार टॅबवर क्लिक करा.

मोबाईलच्या माध्यमातूनही कसे कराल आधार-पॅन लिंक?
प्राप्तिकर विभागाने त्यासाठी 567678 किंवा 56161 हे दोन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. या नंबरवर एसएमएस करून आपण आधारला पॅन कार्ड लिंक करू शकता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India: टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT