Maharashtra chamber of commerce sakal media
अर्थविश्व

महिला उद्योजकांना मिळणार चालना; राज्यात सहा विभागात अॅग्रोबेस क्लस्टर

राज्यात सहा महिला व अॅग्रोबेस क्लस्टर; महाराष्ट्र चेंबरची माहिती

कृष्ण जोशी

मुंबई : सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजक व महिला उद्योजकांना (Business for women's) प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सहा विभागात महिला आणि अॅग्रोबेस क्लस्टरची (Agro based cluster) निर्मिती करून स्थानिक व्यापार उद्योगांना निर्यातीसाठी चालना देण्यात येईल, असे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे (Maharashtra chamber of commerce) नुकतेच जाहीर करण्यात आले.  

भारत - लिमा (पेरू आणि बोलिव्हिया) महावाणिज्यदूत कार्यालय, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि इंडिया-पेरू चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यातर्फे राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी गुरुवारी (ता. 27) आभासी चर्चासत्र झाले. महाराष्ट्राला भारतातील पहिली एक ट्रिलियन डॉलर (एक लाखकोटी डॉलर) अर्थव्यवस्था बनविण्याचे लक्ष असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

राज्यातील निर्यात वाढविण्यासाठी व जागतिक बाजारपेठेत संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र चेंबरने दक्षिण कोरिया, तैवान, आणि थायलंडमध्ये दौरे केले. तसेच विविध देशातील आंतरराष्ट्रीय संघटना व चेंबर ऑफ कॉमर्सबरोबर 27 सामंजस्य करार केले आहेत. राज्यामधील व्यापार व्यवसाय वाढावा, महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक वाढावी, नवीन व्यापार उद्योग यावेत यासाठी चेंबरने राज्यात उद्योग, धोरणकर्ते, बँक, वित्तीय संस्था आदींमध्ये चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. भारत - लिमा (पेरू आणि बोलिव्हिया) व्यापार उद्योगांसाठी द्विपक्षीय करार झाला असून यामध्ये अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. यामुळे निश्चितच व्यापार उद्योगांच्या अनेक नवीन संधी निर्माण होतील, असेही यावेळी सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT