अर्थविश्व

‘बिटकॉइन’च्या मूल्याचा उच्चांक!

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मध्यंतरी ‘रॅन्समवेअर’मुळे चर्चेत आलेल्या बिटकॉइन या व्हर्च्युअल करन्सीने आज नवा उच्चांक प्रस्थापित केला. जागतिक बाजारात एका बिटकॉइनचे मूल्य १५,२५७ अमेरिकी डॉलरवर पोचले होते. म्हणजेच भारतीय रुपयांत सध्या एका बिटकॉइनचे मूल्य सुमारे ९ लाख ८१ हजार रुपये आहे. परंतु, मूल्यवाढीचा हा फुगा असून, तो कधीही फुटण्याची शक्‍यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, सात वर्षांपूर्वी एका बिटकॉइनचे मूल्य फक्त ८ रुपये म्हणजेच ०.००३ डॉलर इतके होते.

गेल्या काही दिवसांत या आभासी चलनाच्या मूल्यात वेगाने वाढ झाली आहे. आज एका बिटकॉइनचे मूल्य १५ हजार अमेरिकी डॉलरच्या पुढे गेल्याने तमाम अर्थविश्‍वाचे डोळे विस्फारले गेले; पण याचबरोबर धोक्‍याची घंटाही वाजली असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मागणी आणि पुरवठा तत्त्वावर मूल्य ठरणाऱ्या या चलनातील ही वाढ म्हणजे एकप्रकारे फुगा असून, तो जोरात फुटूही शकतो, अशी भीती काहींनी व्यक्त केली आहे.

भारतात बिटकॉइनला कायदेशीर मान्यता दिलेली नाही. त्याचमुळे अर्थ मंत्रालयानेदेखील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. कारण रिझर्व्ह बॅंकेसारख्या कोणत्याही मध्यवर्ती बॅंकेचे या चलनावर आणि त्याच्या व्यवहारांवर नियंत्रण वा नियमन नाही. बिटकॉइन हा एक गुंतवणुकीचा पर्याय होऊ शकतो का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT