वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

Report in Washington Post: वॉशिंग्टन पोस्ट या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेच्या संकेतस्थळावर एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला असून यात भारतावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
pm modi biden
pm modi biden

नवी दिल्ली- वॉशिंग्टन पोस्ट या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेच्या संकेतस्थळावर एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला असून यात भारतावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आलाय की, अमेरिकेत राहणारा खलिस्तानी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येच्या कटामागे भारतीय अधिकाऱ्याचा हात होता. याशिवाय कॅनडामधील खलिस्तानी हरदीप सिंह निज्जर याची हत्या भारतीय एजेंट्सनी केली आहे.

अमेरिकेतील या रिपोर्टमुळे खळबळ उडाली आहे. कारण, हे अत्यंत गंभीर आरोप आहेत. भारताने या रिपोर्टची दखल घेतली असून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. भारताने रिपोर्टमध्ये केलेले दावे तथ्यहीन आणि खोटे असल्याचं म्हटलं आहे. अशा गंभीर प्रकरणामध्ये अत्यंत आधारहीन रिपोर्ट समोर आणण्यात आला आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय की, सीआरपीएफच्या एका माजी अधिकाऱ्याच्या माध्यमातून हा कट रचण्यात आला होता.

pm modi biden
भारत लष्करी खर्चात कितव्या स्थानी? अमेरिका-चीनच्या जवळसुद्धा नाही; सर्वात बलाढ्य 10 देशांची नावे जाणून घ्या

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. रिपोर्टमध्ये कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करण्यात आले आहेत. अमेरिकेने यापूर्वीच यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर आम्ही याप्ररणी एक समिती स्थापन केली होती. अमेरिकेने काही आरोप केले होते. त्यांच्याकडून आम्ही इनपूट देखील घेतले होते.

भारताने स्थापन केलेली समिती तपास करत आहेत. अमेरिकेने जी काही माहिती पुरवली आहे. त्याची सत्यता पडताळून पाहिली जात आहे. त्यामुळे याआधीच यात तथ्यहीन आरोप करणे योग्य नाही, असंही ते म्हणाले.

pm modi biden
पन्नू हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेच्या कारवाईवर भारताचं मोठं वक्तव्य! म्हटलं, हे कृत्य म्हणजे...

अमेरिकेच्या मॅनहॅटन कोर्टामध्ये गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी खटला सुरु आहे. यामध्ये भारतीय नागरिक निखिल गुप्ता यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. निखिल गुप्ता हे सध्या चेक-रिपब्लिकच्या तुरुंगात आहेत. त्यांचे प्रत्यार्पण करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. गुप्ता यांच्या आदेशानंतरच हत्येचा कट रचला गेला असा आरोप रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

कॅनडामध्ये खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंग निज्जर याची काही अज्ञातानी हत्या केली होती. या हत्येमागे भारतीय एजेंट्स असल्याचा दावा कॅनडासह अमेरिकेने केला आहे. मात्र, भारताने हे आरोप फेटाळून लावले आहेत. भारताने संबंधितांकडे पुरावे सादर करण्याची मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com