Puinjab-National-Bank
Puinjab-National-Bank 
अर्थविश्व

‘पीएनबी’बाहेर ठेवीदारांच्या रांगा

श्‍यामल रॉय

कोलकता - हिरे व्यापारी नीरव मोदी याने ‘पंजाब नॅशनल बॅंके’ला (पीएनबी) ११ हजार ३०० कोटी रुपयांना गंडा घातल्यानंतर आता देशभरातील या बॅंकेच्या व्यवहारांवर याचा परिणाम होऊ लागला आहे.

पश्‍चिम बंगालमध्ये अनेक ठेवीदारांनी या बॅंकेतील आपल्या ठेवी काढून घ्यायला सुरवात केली असून, ‘गीतांजली जेम्स’ची फ्रॅंचायझी घेतलेल्या अनेक सुवर्णकारांनी रातोरात गीतांजलीची फलके उतरविली असून, त्या ठिकाणी दुसऱ्या ब्रॅंडची नावे लावली आहेत. सिलीगुडी, उत्तर बंगालमधील दागिन्यांच्या शोरूमवरील ‘गीतांजली’चे नाव गायब झाले आहे. ‘गीतांजली’च्या जागी ‘पेरिवल जेम्स’चे नाव झळकू लागले आहे.सर्वच गुंतवणूकदारांनी ‘पीएनबी’मधील ठेवी काढून घ्यायला सुरवात केल्याने बॅंक कर्मचाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढला आहे. काहीजण केवळ खाते सुरू राहावे म्हणून नाममात्र रक्कम या बॅंकेमध्ये ठेवत असल्याचे आढळून आले आहे. ‘पीएनबी’च्या अधिकाऱ्यांनी जरी याचा इन्कार केला असला, तरीसुद्धा बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार या बॅंकेवरील लोकांचा विश्‍वास उडाला आहे. वर्धमान जिल्ह्यातील ठेवीदारांनी साडेतीन कोटींच्या ठेवी काढून घेतल्याचा दावा करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रायगडमध्ये मतदारांनी मतदानानंतर केलं रक्तदान..

SCROLL FOR NEXT