अर्थविश्व

फिनटेक  : इन्स्टा लोन

अतुल कहाते

‘तुम्हाला पैसे हवे आहेत? मग आम्हाला भेटा’ असा आकर्षून घेणारा मजकूर असलेल्या जाहिराती काही वर्षांपूर्वी ठिकठिकाणी भित्तिपत्रकांच्या रूपाने दिसत असत. कालांतराने संबंधित कंपनी आर्थिक गैरव्यवहारांमुळे बुडाल्याच्या बातम्या वाचायला मिळाल्या. या जाहिरातीमधील ‘पैसे’ हा शब्द कर्जाऐवजी वापरलेला होता, हे उघडच आहे. थोडक्यात सांगायचे, तर ही कंपनी लोकांना कर्ज उपलब्ध करून देत होती. आता ‘फिनटेक’ कंपन्यांमुळे या संकल्पनेनेही आधुनिक रूप धारण केलेले असून, ‘तुम्हाला पैसे हवे आहेत? मग आम्हाला न भेटताच पैसे घ्या’ अशी जाहिरात जास्त शोभून दिसेल, अशी आता परिस्थिती आहे. याचे कारण म्हणजे या कंपन्या आता पैशांची आवश्यकता असलेल्या लोकांना तातडीने कर्ज उपलब्ध करून देतात. यामुळे अनेकदा अशा कर्जांना ‘इन्स्टा लोन’ असे म्हटले जाते.

या कर्जांचे निरनिराळे प्रकार असू शकतात. कर्ज घेणाऱ्‍याची ते कर्ज फेडण्याची ऐपत, त्याची नक्की गरज, त्याची एकूण परिस्थिती यांचा विचार करून कर्ज देणाऱ्‍या कंपन्या त्यासंबंधीचा निर्णय घेतात. तसेच हे कर्ज किती रकमेचे मिळावे, त्याच्या परतफेडीच्या अटी काय असाव्यात, अशा गोष्टी ठरवतानाही हे मुद्दे विचारात घेतले जातात. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाला अत्यंत तातडीचे कर्ज हवे असेल; पण त्याच्याकडे क्रेडिट कार्ड असेल, तर त्याची बॅंक त्याला क्रेडिट कार्डावर ‘इन्स्टा लोन’ देऊ शकते. याउलट, एखाद्या माणसाकडे समजा क्रेडिट कार्ड नसेल, तर त्याला त्यामुळे कर्ज मिळण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी बॅंक त्याला वैयक्तिक पातळीवरील कर्ज म्हणजेच ‘पर्सनल लोन’ देऊ शकते. 

शहाण्या माणसाने अंथरूण पाहून पाय पसरावेत, असे आपण ऐकत आलेलो आहोत. त्यात खूप तथ्य असले तरी परिस्थितीनुसार माणसाला कधीतरी कर्ज घ्यावे लागते. या कर्जाची परतफेड करण्याची आपली क्षमता आहे का, या गोष्टीचा लोक विचार करतात; पण कधीकधी परिस्थितीमुळे आणि कधीकधी आपल्या कुवतीला प्रमाणाबाहेर लेखल्यामुळे अवाजवी कर्ज घेण्याची चूकही अनेक जणांकडून होऊ शकते. नेमक्या याच गोष्टीचा गैरफायदा उठवून कर्ज घेणाऱ्या लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या दुष्कर्मातही काही कंपन्या सहभागी असतात. अलीकडेच या संदर्भातील काही प्रकरणे संबंधित कर्जदारांना आत्महत्या करायला भाग पाडण्यापर्यंत गेली असल्याचे आपण वाचलेही असेल. 

‘इन्स्टा लोन’च्या या चांगल्या आणि वाईट अशा विविध कंगोऱ्यांकडे आपण पुढच्या काही भागांमध्ये नजर टाकणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT