अर्थविश्व

बँकांच्या थकीत कर्जांचे प्रमाण घटले 

पीटीआय

मुंबई : "आरबीआय'ने बॅंकिंग क्षेत्राच्या प्रगतीविषयी अहवाल जाहीर केला आहे. यात म्हटले आहे, की मागील संपूर्ण आर्थिक वर्षात एकूण थकीत कर्जाचे प्रमाण 11.2 टक्के होते. त्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात ते 9.1 टक्‍क्‍यांवर आले आहे.

चालू वर्षात निव्वळ थकीत कर्जांचे प्रमाण 3.7 टक्‍क्‍यांवर आले आहे. मागील आर्थिक वर्षात ते 6 टक्के होते. मागील सात वर्षे बॅंकांच्या थकीत कर्जांमध्ये वाढ होत होती. आता बॅंकांकडून थकीत कर्जे ताळेबंदात दाखविण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असल्याने थकीत कर्जे कमी होऊ लागली आहेत. 

खासगी बॅंकांच्या एकूण थकीत कर्जांमध्ये चालू आर्थिक वर्षात वाढ होऊन ते 5.7 टक्‍क्‍यांवर गेला आहे. मागील आर्थिक वर्षात सप्टेंबरअखेरीस 4.7 टक्के होता. याच वेळी खासगी बॅंकांची निव्वळ थकीत कर्जे चालू वर्षात 2 टक्‍क्‍यांवर आली आहेत. मागील आर्थिक वर्षातील याच काळात हे प्रमाण 2.4 टक्के होते. आयडीबीआय बॅंक वगळता खासगी क्षेत्रातील सर्व बॅंकांची एकूण थकीत कर्जे कमी झाली आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

दृष्टिक्षेपात एनपीए (एप्रिल ते सप्टेंबर 2019) 
- सार्वजनिक बॅंकांचा एकूण एनपीए 11.6 टक्के 
- सार्वजनिक बॅंकांचा निव्वळ एनपीए 4.8 टक्के 
- खासगी बॅंकांचा एकूण एनपीए 5.3 टक्के 
- खासगी बॅंकांचा निव्वळ एनपीए 2 टक्के 
- आयडीबीआय बॅंकेचा एकूण एनपीए 29.4 टक्के 
- कृषी क्षेत्राच्या एकूण एनपीएमध्ये वाढ 
- औद्योगिक क्षेत्राचा एनपीए सर्वाधिक 17.4 टक्के 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: गौतमी पाटीलने घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT