

IIT Bombay Sahil Wakode Death Case
ESakal
मुंबई : पवई आयआयटी बॉम्बे शुक्रवार (ता. १८ सप्टेंबर) रोजी बीटेकचा विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे (२२) याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. साहिल एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी असून तो यवतमाळ येथे राहणारा होता. त्याने वसतिगृहात छताच्या पंख्याला गळफास लावून त्याच जीवन संपवलं.