stock
stock 
अर्थविश्व

बाजाराचे मूल्यांकन पाहून गुंतवणूक हवी !

भूषण गोडबोले

मागील आठवड्यात सेन्सेक्स ३९,६१४ अंशांवर, तर निफ्टी ११,६४२ अंशांवर बंद झाला. अमेरिकी शेअर बाजारातील घसरणीपाठोपाठ जागतिक बाजारातील संकेतानुसार, भारतीय शेअर बाजाराने देखील घसरण दर्शविली. अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहत असल्याने अमेरिकी शेअर बाजार चंचलता दर्शवीत आहे. यामुळे आगामी आठवड्यात देखील अमेरिकी शेअर बाजारातील होणाऱ्या हालचालींचे पडसाद जागतिक शेअर बाजारांमध्ये उमटणे अपेक्षित आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक या निफ्टीतील कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाल्याने, तसेच आगामी आठवड्यात एचडीएफसी लि., सन फार्मा, स्टेट बँक आदी निफ्टीमधील कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार असल्याने त्याचा देखील बाजारावर परिणाम होणे अपेक्षित आहे. मध्यम अवधीच्या आलेखानुसार आगामी कालावधीसाठी ‘सेन्सेक्स’ची ३६,४९६; तर ‘निफ्टी’ची १०,७९० ही महत्त्वाची आधार पातळी आहे. शॉर्टटर्मच्या आलेखानुसार अदानी एंटरप्राइजेस, अदानी गॅस लि., चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स, अंबुजा सिमेंट आदी कंपन्यांचे शेअर तेजीचा कल दर्शवीत आहेत.

आणखी बातम्या व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अदानी एंटरप्राइजेसमध्ये तेजी
आगामी आठवड्यात अदानी एंटरप्राइजेस, अदानी गॅस लि. या कंपन्यांचे देखील अनुक्रमे ३ व ४ नोव्हेंबर रोजी तिमाही निकाल जाहीर होतील. ७ ऑक्टोबरपासून २९ ऑक्टोबरपर्यंत मर्यादित पट्ट्यात हालचाल दर्शविल्यानंतर अदानी एंटरप्राइजेस या कंपनीच्या शेअरने मागील आठवड्यात रु. ३३५ या अडथळा पातळीच्या वर रु. ३३९ बंद भाव देऊन अल्पावधीच्या आलेखानुसार तेजीचे संकेत दिले आहेत. यामुळे अदानी एंटरप्राइजेस या शेअरचा भाव रु. ३०४ या स्टॉपलॉस पातळीच्या वर आहे, तोपर्यंत शॉर्टटर्ममध्ये आणखी वाढ दर्शवू शकतो. तसेच, अदानी गॅस या शेअरचा भाव रु. १८९ या स्टॉपलॉस पातळीच्या वर आहे, तोपर्यंत तेजीचा कल दर्शवीत आहे. 

टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा
भारतीय शेअर बाजाराचे मूलभूत मूल्यांकन फंडामेंटल्सनुसार महाग दिसत आहे, यामुळे सद्यःस्थितीत शॉर्टटर्म ट्रेडिंग करताना भांडवल मर्यादितच ठेवणे आवश्यक आहे. अंदाज चुकल्यास मर्यादितच भांडवल गुंतविल्याने, तसेच स्टॉपलॉस ठेवल्याने तोटा मर्यादितच ठेवणे शक्य होऊ शकेल. टप्प्याटप्प्याने लांब पल्ल्याची गुंतवणूक करणाऱ्यांसाठी बाजारातील पडझड ही संधीच असू शकेल. आयआरसीटीसी, ब्रिटानिया, व्हीआयपी इंडस्ट्रीज आदी कंपन्यांचा आगामी ५ ते १० वर्षांसाठी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यासाठी विचार करता येऊ शकेल.  

(लेखक सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत. लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. त्यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT