Budget 2023  sakal
अर्थविश्व

Budget 2023 : शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट? वाचा काय आहे मोदी सरकारचा नवीन प्लॅन

केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे

सकाळ डिजिटल टीम

Budget 2023 : पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा सरकार करू शकते. केंद्र सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पाचवा अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबत मोठी घोषणा अपेक्षित आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी खास ठरू शकतो.

सातत्याने महागाई दर वाढत असताना. या अर्थसंकल्पाकडून जनतेला मोठ्या आशा आहेत. केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधीशी संबंधित मोठी घोषणा करू शकते, असे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर तुम्हाला एक चांगली बातमी मिळू शकते. तुमचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते.

हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

आगामी अर्थसंकल्प 2023 मध्ये, केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधीमध्ये वार्षिक 6,000 रुपयांच्या वाढीची घोषणा करू शकते. प्रत्यक्षात या योजनेंतर्गत अनेक वेळा रक्कम वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी 2022 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातही किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्याची मागणी जोरात सुरू होती.

मात्र यंदा या अर्थसंकल्पात या योजनेच्या रकमेत वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. याशिवाय येत्या आर्थिक वर्षापासून ही रक्कम 6 हजारांवरून 8 हजार रुपयांपर्यंत वाढवून शेतकऱ्यांना वर्षभरात 2 हजार रुपयांचे 4 हप्ते देता येतील, अशीही चर्चा आहे.

विशेष म्हणजे पंतप्रधान किसान योजना ही सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. या अंतर्गत, देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी, सरकार त्यांच्या खात्यावर 2-2 हजार रुपयांचे तीन हप्ते म्हणजे वार्षिक 6 हजार रुपये पाठवते.

आतापर्यंत या योजनेचे 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात आले आहेत. आता शेतकरी 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. शासनाने या योजनेची रक्कम वाढविल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT