अर्थविश्व

सेन्सेक्‍सची घसरगुंडी 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - विकासदराची आकडेवारी जाहीर होण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आठवडाभरात तेजीच्या लाटेवर वधारलेल्या शेअर्सची गुरुवारी (ता.३०) चौफेर विक्री करून नफावसुली केली. याचसोबत वित्तीय तूट वाढल्याने शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. परिणामी सेन्सेक्‍स ४५३.४१ अंशांनी कोसळून ३३,१४९ अंशांवर बंद झाला. निफ्टीही १३४.७५ अंशांनी घटून १०,२२६ अंशांवर स्थिरावला. आशिया आणि युरोपातील नकारात्मक संकेतांनी बाजारातील दबाव वाढवला. चलन बाजारात रुपयाची डॉलरसमोर दमछाक झाली. 

बांधकाम, पीएसयू, एफएमसीजी, धातू, वित्त सेवा पुरवठादार कंपन्या, पायाभूत सेवा क्षेत्रातील शेअरमध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला. नोव्हेंबर महिन्याची वायदेपूर्ती असल्याने बहुतांश गुंतवणूकदारांनी विक्री करून नफा कमावण्याला प्राधान्य दिल्याचे शेअर दलालांनी सांगितले. सकाळपासून विक्रीचा मारा सुरू झाला तो बाजार बंद होईपर्यंत कायम राहिला. गेल्या दोन महिन्यांतील एका सत्रातील निर्देशांकाची मोठी आपटी ठरली. कोटक बॅंक, सिप्ला, ओएनजीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, कोल इंडिया, ॲक्‍सिस बॅंक, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, एचडीएफसी लिमिटेड, टाटा स्टील, लुपिन, रिलायन्स आदी शेअरमध्ये घसरण झाली. 

डॉ. रेड्डी लॅब, एनटीपीसी, डाबर, नेस्ले, जेट एअरवेज, पराग मिल्क फुड्‌स, बॉम्बे डाइंग, जैन इरिगेशन, एडलवाइज फायनान्शिअल सर्व्हिसेस, जुबिलंट लाईफ सायन्सेस, जेएसडब्लू एनर्जी, टोरंट पॉवर, नाल्को आदी शेअर तेजीसह बंद झाले. आर्थिक आघाडीवर निराशाजनक कामगिरी करणाऱ्या त्रिभोवनदास भीमजी झव्हेरी लिमिटेडच्या शेअर्सची गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली. ज्यामुळे कंपनीचा शेअर १४.७० टक्‍क्‍यांनी घसरून १२३.१० रुपयांवर बंद झाला. 

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर बॅंक निफ्टीत सर्वाधिक १.४६ टक्‍क्‍यांची घट झाली. त्याखालोखाल पीएसयू निफ्टीत १.९९ टक्‍क्‍यांची घट झाली.  दिवसअखेर सेन्सेक्‍स आणि निफ्टीत जवळपास एक टक्‍क्‍याची घट झाली. आशियात हाँगकाँग, शांघाई, जपान आदी बाजारांमध्ये घसरण नोंदवण्यात आली.

जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे बाजाराची सुरवात निराशाजनक झाली. त्यातच वित्तीय तुटीचे उद्दिष्ट एप्रिल ते ऑक्‍टोबर या कालावधीत तरतुदीच्या ९६ टक्‍के पूर्ण झाल्याची आकडेवारी जाहीर झाली. ज्यामुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. 
- कार्तिकराज लक्ष्मण, वरिष्ठ विश्‍लेषक, बीएनपी पारिबा म्युच्युअल फंड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT