अर्थविश्व

शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण

पीटीआय

मुंबई - जागतिक पातळीवरून मिळणाऱ्या सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. सुरवातीच्या तेजीनंतर बाजार एका मर्यादित पातळीत व्यवहार करत होते. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्‍स’ ८३.२० अंशांनी वधारून ३३,५६१.५५ पातळीवर व्यवहार करत स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ १५.४० अंशांनी वधारून १०,३४२.३० अंशांवर बंद झाला. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळखोरी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. परिणामी आज बॅंकांच्या शेअरमध्ये तेजी होती. पीएसयू बॅंक निर्देशांकात १.२५ टक्के वाढ नोंदविण्यात आली. क्षेत्रीय पातळीवर ऑटो, एफएमसीजी, मीडिया कंपन्यांचे शेअर सर्वाधिक वधारले होते; मात्र फार्मा, मेटल आणि खासगी बॅंकांच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण नोंदविण्यात आली. मुंबई शेअर बाजारात झी एंटरटेनमेंट, अदानी पोर्ट, अल्ट्राटेक सिमेंट, अंबुजा सिमेंट, एचडीएफसी, भेल, एसबीआय आणि एशियन पेंट्‌स या कंपन्यांचे शेअर प्रत्येकी ४ ते १.२५ टक्के वधारून बंद झाले. टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, भारती इन्फ्राटेल, हिंदाल्को, डॉ. रेड्डीज, ॲक्‍सिस बॅंक, लुपिन, भारती एअरटेल आणि एनटीपीसी या कंपन्यांच्या शेअरमध्ये २.३ ते ०.७५ टक्‍क्‍यांची घसरण झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT